IMPIMP

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

by nagesh
Maharashtra State Women Commission Public hearing from 19th to 21st July under Mhila Aayog Aypa Dari initiative in Pune district

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली आहे. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना धमकी देण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचा पदभार स्विकारल्यानंतर अनेक कामे केली आहेत. राज्यातील महिलांच्या बाबत घडणाऱ्या घडामोडींवर त्यांनी लगेच दखल घेतली आहे. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधीही त्यांना धमकीचे फोन आलेले आहेत.

 

रुपाली चाकणकर या महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची खंबीर बाजू मांडत विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रावादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावर असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar | Maharashtra state womens commission chairperson and ncp leader rupali chakankar receives death threats

 

हे देखील वाचा :

Char Dham Yatra New Rules | चारधाम यात्रेचे बदलले नियम, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लागू झाली ‘ही’ अट

Dr. Neelam Gorhe | निलम गोऱ्हेंच्या कार्यालयात धमकीचे पत्र, जाणून घ्या कारण

Post Office FD | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त लाभ; जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल

Pune Crime | हुंड्याच्या व भिक मागण्याच्या उद्देशाने 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण, सराईत महिला आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांकडून अटक

 

Related Posts