IMPIMP

Rupali Patil On Devendra Fadnavis | ‘बाबरी पाडली त्यावेळी फडणवीसांचे वय काय होते ?’ रुपाली पाटील यांचा खोचक सवाल

by nagesh
Rupali Patil On Devendra Fadnavis | what was the age of devendra fadnavis when babri destroyed says ncp leader rupali patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rupali Patil On Devendra Fadnavis | भाजपची (BJP) रविवारी सभा झाली त्यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबरी पाडली (Babri Masjid Demolition) तेव्हा शिवसेना (Shivsena) कुठे होती ? बाबरी पाडली त्यावेळी आपण तिथं उपस्थित होतो, असा दावा त्यांनी केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी खोचक सवाल केला आहे. बाबरी पाडली त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचे वय काय होते ? असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. (Rupali Patil On Devendra Fadnavis)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेवर बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामागे भाजपचा हात आहे. मुख्यमंत्रीपदाची (CM) आस लावून बसलेले फडणवीस हे सर्व करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. यावरही रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Rupali Patil On Devendra Fadnavis)

 

राष्ट्रवादीमध्ये सर्व धर्माचे लोक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व धर्माचे लोक आहेत. ते जातीयवादी अजिबात नाहीत. अनेक धर्माचे आणि जातीचे लोक आज पक्षात काम करत आहेत, असे रुपाली पाटील यांनी सांगितले. राज्यात जातीजातींमध्ये विष कालवण्याचे काम शरद पवार यांनी केलं असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

 

राज्यात दंगली घडवण्याचा कट
रुपाली पाटील म्हणाल्या, काही प्रवृत्तींचा राज्यात दंगली (Riot) घडवण्याचा कट आहे.
परंतु तसं राज्यात होणार नाही. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) भक्कम आहे.
राज ठाकरे यांच्या भाषाणात अनेक मुद्दे आले आहेत आण त्याची तपासणी पोलीस (Police Investigation) करीत आहेत.
पोलिसांकडून मनसे (MNS) कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात येत आहेत.
त्यांच्या भाषणामुळे जर काही घटना झाल्या तर कारवाई होईलच, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

21 व्या शतकात जाती धर्माचे राजकारण हे दुर्दैवी

रुपाली पाटील म्हणाल्या, लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) जरी ब्राह्मण (Brahmin) होते तरी ते ब्राह्मण म्हणून राहिले नाहीत.
ते सर्वधर्मीयांसाठी काम करत होते. ते समाजसुधारक होते. त्यांनी जातपात पाहिली नाही त्यांनी त्यांचे काम केले.
परंतु त्या जातीचा आहे म्हणून त्यांनी काम केलं हे आता आपण बोलणं हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची समाधी जर लोकमान्य टिळक यांनी बांधली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी शोधून काढली.
लोकमान्य टिळकांना ज्यावेळी अटक झाली त्यावेळी ज्योतिबा फुले हे जामीनदार (Guarantor) होते.
मग त्यावेळी टिळकांना अटक (Arrest) झाली मग त्यांच्या समाजातील इतर कोठे होते ? का फुलेंनीच जामीन दिला ?
असं आपण घेऊन बसणार का ? आता 21 व्या शतकात जातीधर्माचे राजकारण करणं हे दुर्दैवी असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले.

 

 

Web Title :- Rupali Patil On Devendra Fadnavis | what was the age of devendra fadnavis when babri destroyed says ncp leader rupali patil

 

हे देखील वाचा :

Jayant Patil On BJP And MNS | ‘यातून भाजप आणि मनसेची मिलीभगत आहे हे सिद्ध होतेय”; ‘टायमिंग’ वरून जयंत पाटलांनी साधला निशाणा !

BJP MLA Ganesh Naik | आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार, नाईक देशाबाहेर पळून जाण्याचा पोलिसांना संशय; विमानतळ प्रशासन सतर्क

Shambhuraj Desai on Narayan Rane | ‘राणे पिता-पुत्रांची किंमत म्हणजे मायनस शून्य’; शंभूराज देसाईंचं राणेंना प्रत्युत्तर

 

Related Posts