IMPIMP

Jayant Patil On BJP And MNS | ‘यातून भाजप आणि मनसेची मिलीभगत आहे हे सिद्ध होतेय”; ‘टायमिंग’ वरून जयंत पाटलांनी साधला निशाणा !

by nagesh
Jayant Patil | suspension of ncp leader jayant patil till the end of winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jayant Patil On BJP And MNS | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. मात्र राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभेच्या टायमिंगबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) फडणवीस आणि ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबईमधील भाजपच्या बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपलं आणि इकडे औरंगाबादमध्ये राज ठाकरे भाषणासाठी व्यासपीठावर आले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना व्यवस्थित मीडिया कव्हरेज मिळेल या हिशोबाने आपल्या भाषणांची वेळ ठरवली होती (Jayant Patil On BJP And MNS). त्यामुळे यातून भाजप – मनसेची मिलीभगत होती हे सिद्ध झाल्याचं जयंत पाटील (Jayant Patil On Raj Thackeray & Devendra Fadnavis) म्हणाले.

 

राज ठाकरे साडे सातला सभेला पोहोचणार होते मात्र त्यांना पोहोचायला 15 – 20 मिनिटे उशीर झाला.
यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनीही सभेच्या 7 वाजून 50 मिनिटांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.
काळजी नको ! फडणवीसांचं भाषण संपेपर्यंत राज ठाकरे गाडीतून फिरत राहतील, आदेशच तसा आहे.
औरंगाबादमध्ये एवढा वेळ कोठेही पोहोचायला लागत नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलं होतं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची सभा आटोपल्यानंतर राज ठाकरे 8 वाजून 3 मिनिटांनी सभेला सुरूवात केली.
त्यामुळे आता सत्ताधारी पक्षांना ठाकरे आणि फडणवीसांवर टीका करण्यासाठी आयतं कोलित मिळालं आहे.

 

Web Title :- Jayant Patil On BJP And MNS | ncp leader jayant patil takes a dig at mns chief raj thackeray and bjp devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ganesh Naik | आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार, नाईक देशाबाहेर पळून जाण्याचा पोलिसांना संशय; विमानतळ प्रशासन सतर्क

Shambhuraj Desai on Narayan Rane | ‘राणे पिता-पुत्रांची किंमत म्हणजे मायनस शून्य’; शंभूराज देसाईंचं राणेंना प्रत्युत्तर

Nana Patole on Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा जो तमाशा सुरू केलाय तो थांबवावा’ – नाना पटोले

 

Related Posts