IMPIMP

Rural Development Department Maharashtra | ग्राम विकास विभाग : कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले

by nagesh
Rural Development Department Maharashtra | The salary of contractual village servants has been increased Maharashtra Cabinet Decision

सरकारसत्ता ऑनलाईन – Rural Development Department Maharashtra | कंत्राटी ग्रामसेवकांच्या (Gram Sevak) मानधनात १० हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. सध्या या ग्रामसेवकास ६ हजार रुपये दरमहिना मिळतात, आता ते १६ हजार एवढे मिळतील. (Rural Development Department Maharashtra)

राज्यात सध्या २७ हजार ९२१ ग्रामपंचायती असून १८ हजार ६७५ नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत.
त्यापैकी १७ हजार १०० पदे भरली असून १५७५ पदे रिक्त आहेत.
वर्ष २००० पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात.
कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात
वाढ करण्याचा प्रस्ताव होता (Maharashtra Cabinet Decision). यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये इतका आर्थिक भार पडेल.

Web Title : Rural Development Department Maharashtra | The salary of contractual village servants has been increased Maharashtra Cabinet Decision

Related Posts