IMPIMP

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात (Pune-
Bangalore Highway Accident) झाल्याची घटना घडली आहे. या महामार्गावरील किणी टोल नाकाजवळ (Kini Toll Naka) उभ्या असलेल्या
कंटेनरला मोटारीची धडक बसल्यानंतर अपघातग्रस्त मोटारीला मागून एका ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू (Died) झाला
आहे. तर एक महिला जखमी (Injured) असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

निलेश कुमार सी (Nilesh Kumar c) (वय 42), संजना माहेश्वरी (Sanjana Maheshwari) (वय 27) जिथ्या त्रिलेश (Jithya Trilesh) (वय 11, रा. सर्व मीनाक्षीनगर बेंगलोर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात अरींनी एन. (Arinni n) (वय 41, रा. बेंगलोर) या जखमी झाल्या आहेत. (Pune-Bangalore Highway Accident)

 

याबाबत माहिती अशी की, निलेश कुमार सी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या महिंद्रा मोटारीतून बंगळुरूकडे निघाल्या होत्या. काल रात्री 12.15 वाजता ते किणी टोल नाक्यापासून पुढे आले. तेथून काही अंतरावर 1 कंटेनर उभा होता. त्याच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर, बॅरॅकेटेड याची व्यवस्था केलेली नव्हती. राष्ट्रीय महामार्गावरील वारणा नदीवरील पुलाच्या उतारावर वळणावर हा कंटेनर उभा केला होता. मोटार चालकास रात्री तो नीट दिसला नाही. मोटार कंटेनरला पाठीमागून धडकून अपघात झाला. तर मोटारीस मागून आलेल्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने वाहन चालवून जोरात धडक दिली आहे.

 

दरम्यान, या अपघातानंतर ट्रक व कंटेनर वरील चालक जखमींना मदत न करता पसार झाले. याबाबत धोंडीराम जयसिंग वड्ड (Dhondiram Jaisingh Wadd) (वय 39 रा. वडवाडी) यांनी शनिवारी सकाळी फिर्याद दाखल केली आहे. यावरुन वडगाव पोलीस ठाण्यात (Wadgaon Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune-Bangalore Highway Accident | pune bangalore national highway accident three killed

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, मित्राला मारल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण

Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक अत्याचार; लोणीकाळभोर परिसरातील घटना

 

Related Posts