IMPIMP

Sachin Vaze | अनिल देशमुखांचे पाय आणखी खोलात ! बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार

by Team Deccan Express
Sachin Waze | anil deshmukh money laundering case sachin wazela declared amnesty witness ready to give all information to cbi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sachin Vaze | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात (Anil Deshmukh) बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी थेट सक्तवसुली संचालनालयाकडे Directorate of Enforcement (ED) माफीचा साक्षीदार (Witness The Apology) बनविण्याची मागणी केली होती. त्यानुसार सचिन वाझेंनी विशेष सीबीआय कोर्टात (Special CBI Court) अर्ज दाखल केला आहे. यानंतर सीबीआयकडून त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत 30 मे रोजी कोर्टात सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

सचिन वाझेंच्या (Sachin Vaze) या अर्जामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दर्शवली आहे. तसेच, माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझेला सर्व तरतुदी तसेच, कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष सीबीआय न्यायालयाने वाझेंचा अर्ज स्वीकारला आहे. त्याचबरोबर त्यांचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसेच इतर आरोपींविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात. याबाबत माहिती एएनआयने दिली.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये (Money Laundering Case) आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचे सचिन वाझेंनी या लेखी पत्रातून सांगितलं होतं. आता याच प्रकरणामध्ये वाझेंनी आयपीसी कलम 306 (IPC Section 306) अंतर्गत वकील रौनक नाईक (Lawyer Raunak Naik) यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.

 

Web Title : Sachin Vaze | dismissed-mumbai police officer sachin vaze wants to become approver in alleged
corruption case against anil deshmukh filed application in special cbi court

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts