IMPIMP

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंची एकाच दिवसात दोनदा बदली

by pranjalishirish
Mansukh Hiren Murder Case | sachin waze explains his role in mansukh hiren murder case said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मनसुख हिरेन Mansukh Hiren यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले सचिन वाझे Sachin Vaje यांचे निलंबन करण्याची मागणी भाजपने सभागृहात लावून धरली होती. अखेर सचिन वाझे Sachin Vaje यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. त्यानंतर सचिन वाझे Sachin Vaje यांची नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आली. गुरुवारी पोलीस मुख्यालयातून अधिकृत पत्रक निघाले. मात्र, आता वेगळीच माहिती समोर आली आहे.

नव्या माहितीनुसार सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्र विभागातून बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. म्हणजेच सचिन वाझे Sachin Vaje यांची एकाच दिवसात दोनदा बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे Sachin Vaje यांची विशेष शाखेत कागदोपत्री बदली करण्यात आली आहे; परंतु असे असले तरी त्यांना पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रात सेवेत राहावे लागणार आहे. यामुळे सचिन वाझे यांना कोणता अधिकारी पाठीशी घलत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. यानंतर ही गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे Sachin Vaje यांच्याकडे सोपवण्यात आला. काही दिवसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. यामध्ये सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाले. हिरेन यांच्या पत्नीने वाझे यांच्यावर आरोप केल्याचा दावा भाजपने केला. त्यानंतर अर्थसंकल्पी अधिवेशनात हा मुद्दा गाजला. भाजपने सचिन वाझे यांचे निलंबन करून अटक करण्याची मागणी केली. मात्र, यावर मुख्यमंत्र्यांनी तपासानंतर निर्णय घेतला जाईल, असे विधानसभेत शेवटच्या दिवशी सांगितले होते.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts