IMPIMP

Sachin Vaze | सचिन वाझेंना जामीन मंजूर; पण, …

by nagesh
Sachin Vaze | sachin waze ed money laundering case sachin waze granted bail but stay in jail due to other cases

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – पैशांची अफरातफर (Money Laundering), मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवणे आदी प्रकरणातील अरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पैशांची अफरातफर प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने वाझेंना जामीन दिला आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी सीआरपीसी (CRPC) कलम 88 अंतर्गत जामीनासाठी अर्ज केला होता.

 

ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला आहे. वाझेंना पैशांची अफरातफर प्रकरणांत जामीन मिळाला असला, तरी इतर प्रकरणांत त्यांची न्यायालयीन कोठडी सुरु आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. वाझे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात मासा (माफीचा साक्षीदार) आहे. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, अन्यथा ते पुराव्यांशी छेडछाड करु शकतात, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी अनिल देशमुख आणि इतरांच्या विरोधात माहिती देण्याचे कबूल केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुलाब्यातील निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या काड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक गाडी बेवारस सोडण्यात आली होती.
त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन (Mansukh Hiren) याची हत्या झाली होती.
त्याच्या मृत्युप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे,
त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून (NIA) अटक करण्यात आली होती.
तसेच सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात पैशांची अफरातफर (Money Laundering) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून
महिन्याला 100 कोटी खंडणी वसूल केल्याचे सचिन वाझे यांनी तपासात सांगितले होते.

 

Web Title :- Sachin Vaze | sachin waze ed money laundering case sachin waze granted bail but stay in jail due to other cases

 

हे देखील वाचा :

Shraddha Walker Murder Case | आफताबने यापूर्वी 2020 मध्ये देखील श्रद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता; तपासात धक्कादाय माहिती उघड

Pune Pimpri Crime | ट्रेडिंग कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन घातला 27 लाखांचा गंडा; वाकड मधील घटना

Ahmednagar Crime | अहमदनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अनाथ तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत ५ जणांनी केला बलात्कार

MSRTC | एसटी महामंडळाने पगारी रजांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

 

Related Posts