IMPIMP

Shraddha Walker Murder Case | आफताबने यापूर्वी 2020 मध्ये देखील श्रद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता; तपासात धक्कादाय माहिती उघड

by nagesh
Shraddha Walker Murder Case | shraddha murder case accused aftab poonawallas first proof found of brutality

दिल्ली : वृत्तसंस्था – वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर (वय 27) या तरुणीचे दिल्लीत तिच्या प्रियकर (आफताब पूनावाला) Aaftab Poonawala याने निर्घूण हत्या (Shraddha Walker Murder Case) केली होती. त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे करत ते दिल्लीच्या महरौली जंगलात फेकले. आफताबला दिल्ली पोलिसांना अटक केली असून, त्याला बोलते केल्यावर त्याने सर्व प्रकाराची कबुली दिली आहे. त्यात त्याने 2020 साली देखील श्रद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Shraddha Walker Murder Case) केला होता, असे तपासात उघड झाले आहे.

 

श्रद्धा हिचे काही जुने फोटो समोर आले आहेत. त्यात श्रद्धाच्या अंगावर आणि चेहऱ्यावर जखमा आहेत. या जोडप्यात सतत वाद होते, हे यावरुन स्पष्ट होत आहे. 2020 साली श्रद्धाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रद्धा आणि आफताब यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा देखील प्रयत्न केला होता. 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने मुंबईतील नालासोपारा पोलीस ठाण्यात (Nalasopara Police Station) आफताब विरोधात एक तक्रार दिली होती. पोलिसांनी आफताबला यावेळी पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले असता, त्याने आत्महत्येची धमकी देत श्रद्धाला तक्रार परत घेण्यास लावली होती, अशी नवीन माहिती आता उघड झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आफताब श्रद्धाला बेदम मारहाण करत होता, असा पोलिसांचा अंदाज आहे.
श्रद्धाच्या मित्राने श्रद्धाचे काही फोटो पोलिसांना उपल्बध करुन दिले आहेत.
3 डिसेंबर 2020 रोजी श्रद्धाला मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते.
तिला मान आणि मणक्याची दुखापत झाली होती.
वसईच्या ओझोन रुग्णालयात (Ozone Hospital, Vasai) तिला पाठ आणि मानदुखीसाठी दाखल करण्यात आले होते.
श्रद्धाच्या मैत्रिणीच्या माहितीनुसार, आफताब श्रद्धाला मारहाण करत होता. तसेच तो गांजा देखील ओढत होता.
त्यामुळे या हत्याप्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.

 

Web Title :- Shraddha Walker Murder Case | shraddha murder case accused aftab poonawallas first proof found of brutality

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | ट्रेडिंग कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन घातला 27 लाखांचा गंडा; वाकड मधील घटना

Ahmednagar Crime | अहमदनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अनाथ तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत ५ जणांनी केला बलात्कार

MSRTC | एसटी महामंडळाने पगारी रजांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

 

Related Posts