IMPIMP

Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away | माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे निधन

by nagesh
Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away

कोपरगाव : सरकारसत्ता ऑनलाइनSahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away | सरपंच ते राज्याचे माजी मंत्री असा राजकीय
प्रवास केलेले आणि साईबाबा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष शंकरराव गेनुजी कोल्हे (Shankarrao Kolhe) यांचे बुधवारी पहाटे साडेचार वाजता नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्यावर आज सायंकाळी साडेचार वाजता कोपरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार, महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून शंकरराव कोल्हे यांनी काम केले होते. (Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away)

 

कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे २४ मार्च १९२९ रोजी झाला होता. त्यांनी येसगावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करीत थेट राज्याचे मंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात त्यांनी अनेक पदावर यशस्वीरित्या काम केले. ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून १९७२ मध्ये अपक्ष म्हणून सर्वप्रथम आमदार झाले होते. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे ते ९ वर्षे उपाध्यक्ष होते. कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे ते अध्यक्षही होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे ते संस्थापक, अध्यक्ष होते.

 

 

Web Title :- Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे तपासात अव्वल

Pune Crime | दीड हजार रुपये परत न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून; डेंगळे पुलाखालील नदीपात्रातील घटना, शिवाजीनगर पोलिसांकडून एकाला अटक

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

 

Related Posts