IMPIMP

Sangli Crime | लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांचा घातला गंडा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन  Sangli Crime | सांगली जिल्ह्यात एका तरुणाला लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांचा गंडा
घातल्याची घटना उघडकीस आली आहे. लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने बेडग येथील बाळू मारुती लवटे (Balu Maruti Lavte) या तरुणाला
चार लाख 60 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या फसवणुकी प्रकरणी प्रमोद कृष्णा शिंगाडे (Pramod Krushna Shingade), संदीप
लक्ष्मण फाटक (Sandep Lakshman Fatak) व अक्षय जाधव (Akshay Jadhav) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात (Miraj Gramin Police
Station) फसवणुकीचा (Fraud Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?

 

बेडग येथील बाळू लवटे सैन्यात भरती होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत होता. यामधूनच प्रमोद शिंगाडे व संदीप फाटक यांच्याशी बाळू लवटे याची ओळख झाली. यानंतर कोल्हापूर जिह्यातील मित्रांमार्फत लष्करात नोकरी लावतो, त्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे शिंगाडे व फाटक यांनी त्याला सांगितले. त्यानंतर या दोघांनी बाळू लवटे याच्या मोबाईलवर मेल पाठवून लष्करात नोकरी लावण्याची हमी दिली. (Sangli Crime)

 

 

यानंतर या दोघांनी सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्का असलेले नोकरीचे पत्रही बाळू लवटे याला पाठविले. त्या बदल्यात लवटे याने आईच्या बँक खात्यावरुन एकदा तीन लाख 46 हजार, नंतर 49 हजार रुपये व पुन्हा 65 हजार असे चार लाख 60 हजार रुपये पाठविले. एवढे पैसे देऊनही सैन्यात नोकरी मिळाली नसल्याने त्याने तिघांकडे वारंवार पाठपुरावा केला.मात्र या तिघांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे कळताच मिरज ग्रामीण पोलिसात (Miraj Rural Police) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sangli Crime | a young man from miraj taluka was cheated of rs 4 lakhs with the lure of getting a job in the army

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मशाल ही पंजाच्या हातात आहे, त्यामुळे तिचा कोणी स्वीकार करणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला

T20 World Cup | स्टंप माइकजवळ शिव्या देणे ‘या’ कर्णधाराला पडले भारी, टी-20 वर्ल्डकपमधून होऊ शकतो पत्ता कट

MCA Election | आशिष शेलार MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता

 

Related Posts