IMPIMP

T20 World Cup | स्टंप माइकजवळ शिव्या देणे ‘या’ कर्णधाराला पडले भारी, टी-20 वर्ल्डकपमधून होऊ शकतो पत्ता कट

by nagesh
T20 World Cup | australia captain aaron finch used bad words in live match and fined for breaching icc code of conduct

पर्थ : वृत्तसंस्था – T20 World Cup | पर्थमध्ये (Perth) इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) टी-20 मालिका सुरू आहे. या
मालिकेच्या पहिल्याच सामन्यात आणि टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) यजमान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या
पहिल्या टी-20 सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲरॉन फिंचवर (Aaron Finch) दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आयसीसीच्या (ICC) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?

इंग्लंडच्या डावाच्या 9 व्या षटकात ॲरॉन फिंच जे काही म्हणाला ते स्टंप माईकवर रेकॉर्ड झाले आहे. यामुळे ॲरॉन फिंचला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर ॲरॉन फिंचने आपल्यावरील सगळे आरोप मान्य केले आहेत. तसेच त्याच्या शिस्तबद्ध रेकॉर्डमध्ये एक मुद्दा नोंदवण्यात आला आहे. म्हणजेच भविष्यात त्याने असे काही काम केल्यास त्याच्यावर मोठी कारवाई केली जाऊ शकते.

 

फिंचला टी-20 विश्वचषकातून बाहेर होण्याची भिती

गेल्या दोन वर्षांतील ॲरॉन फिंचचा हा पहिलाच गुन्हा आहे. मात्र तरीदेखील त्याला धोखा आहे. आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये चार गुण वजा झाल्यास त्या खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते. जर फिंचने हि चूक पुन्हा केल्यास त्याला इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतून किंवा टी-20 विश्वचषकातूनही (T20 World Cup) बाहेर पडावे लागू शकते. या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी (New Zealand)होणार आहे.

 

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ:

ॲरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस,
ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श,
ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ॲडम झाम्पा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- T20 World Cup | australia captain aaron finch used bad words in live match and fined for breaching icc code of conduct

 

हे देखील वाचा :

MLA Sanjay Gaaikwad | ‘उद्धव ठाकरे बापाच्या नावाची शिवसेना वाचवू शकले नाहीत, आम्ही त्यांच्या नावाने शिवसेना स्वीकारली’, संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर टीका

MCA Election | आशिष शेलार MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता

Pune Crime | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या पप्पु खरातला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts