IMPIMP

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मशाल ही पंजाच्या हातात आहे, त्यामुळे तिचा कोणी स्वीकार करणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला

by nagesh
Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule replied to supriya sule allegation on shinde government in jintendra awhad case pune news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे  आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले आणि त्यांना निवडणूक चिन्ह मशाल मिळाली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या आश्रयामुळे जिवंत आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा (Hindutva) विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यामुळे उद्धव ठाकरेंना कोणतेही चिन्ह मिळो, त्यातून काहीही साध्य होणार नाही. त्यांची मशाल (Mashal Symbol) कधीही पेटणार नाही. जनता त्यांची मशाल स्वीकारणार नाही.  त्यांची मशाल ही पंजाच्या हातात आहे. त्यांचे हिंदुत्व बेगडी आहे. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी त्यांनी कोणचाच विचार केला नाही, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

 

यावेळी त्यांनी नाना पटोले (Nana Patole) यांना देखील धारेवर धरले. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) यांच्यावर टीका करायची आणि आपली लोकप्रियता वाढवायाची एवढेच काम नाना पटोले
यांच्याजवळ राहिले आहे. तसेच सत्ता गेल्यापासून ते एवढे बावचाळलेत की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
त्यांना भाजपने फटकारुन घालविल्यापासून त्यांची ही अवस्था झाली आहे.
आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांची ही अवस्था झाली असून,
त्यांना ध्यानी मनी स्वप्नी फक्त नरेंद्र मोदीच दिसतात.
त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर राहून काहीही काम केले नाही,
असा आरोप देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | Uddhav Thackeray’s torch is in the hand of a paw, so no one will accept it; Chandrasekhar Bawankule’s advice to Thackeray

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | स्टंप माइकजवळ शिव्या देणे ‘या’ कर्णधाराला पडले भारी, टी-20 वर्ल्डकपमधून होऊ शकतो पत्ता कट

MLA Sanjay Gaaikwad | ‘उद्धव ठाकरे बापाच्या नावाची शिवसेना वाचवू शकले नाहीत, आम्ही त्यांच्या नावाने शिवसेना स्वीकारली’, संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर टीका

MCA Election | आशिष शेलार MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता

 

Related Posts