Sangli Crime | धक्कादायक! जमिनीसाठी पोलीस पुत्र बनला ‘हैवान’, छातीत लाथ घालून वृद्धाचा घेतला जीव

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन– एका जमिनीच्या (Land) तुकड्याच्या वादातून एका पोलिसाच्या मुलाने वृद्ध व्यक्तीच्या छातीत (Chest) लाथ मारली. यामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) मिरज याठिकाणी घडला आहे. जमिनीसाठी वृद्धाचा जीव घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या असून याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाने तक्रार दिली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) खळबळ उडाली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
जयंतीलाल मूलजी ठक्कर Jayantilal Mulji Thakkar (वय-82) असं हत्या झालेल्या वृद्धाचं नाव आहे. तर राहुल मोहन मोरे Rahul Mohan More (वय-42) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि मयत हे एकमेकांच्या शेजारी राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज पंढरपूर रस्त्यावरील (Miraj Pandharpur Road) ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर (Rural Police Station) ठक्कर यांचे घर आहे. त्यांच्या घरासमोर गादी आणि पडदे विक्रीचे दुकान आहे. गादीच्या कारखान्यासाठी ठक्कर यांनी आपल्या घरासमोर शेड उभारलं आहे. (Sangli Crime)
ठक्कर यांनी उभारलेल्या शेडचा काही भाग आरोपी राहुल मोरे यांच्या प्लॉटमध्ये आल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद होता.
याच कारणावर आरोपी आणि मयत यांचा अनेकवेळा वाद झाला होता.
गुरुवारी (दि. 10) सकाळी याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. यावेळी मयत जयंतिलाल आणि त्यांचा मुलगा मयूर हे घरासमोर बसले होते. त्यावेळी आरोपी मोरे याने शिवीगाळ करुन जयंतीलाल यांच्या छातीत जोरात लाथ मारली.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
ही लाथ एवढी जोरात होती की जयंतीलाल यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती मयूर याने पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जयंतीलाल ठक्कर यांचा मुलगा मयूर याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपीला अटक केली.
आरोपी राहुल मोरे याचे वडील हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (Retired Police Officer) आहेत.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Sangli Crime | old man died after accused kicked him on chest murder in miraj sangli crime news
Nitin Gadkari | कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय, गडकरींनी दिली माहिती
Kirit Somaiya | किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…’
Comments are closed.