IMPIMP

Sanjay Raut | ईडीला कोर्टाने झापले! संजय राऊत मीडियाशी बोलतात, तुमच्या का पोटात दुखतंय?

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut gets bail know his first reaction from pmla court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन संजय राऊत (Sanjay Raut) सुनावणीसाठी कोर्टात येताना बाहेर उभे असलेल्या पत्रकारांशी बोलतात, अशी तक्रार ईडीच्या (ED) वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्यावर कोर्टाने आज ईडीला झापताना म्हटले, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कोर्टाच्या बाहेर मीडियाशी बोलतात, त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्याच म्हणण्यानुसार ही राजकीय केस नाही, मग राऊत लोकप्रतिनिधी आहेत, ते जर कोर्टाबाहेर मीडियाशी बोलले तर तुम्हाला नेमकी काय अडचण आहे? असा सवाल कोर्टाने ईडीला विचारला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patra Chawl Case) अटकेत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर (Bail Application) सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तिवाद करायचा असल्याचे सांगितल्याने कोर्टाने 2 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली. यामुळे राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 15 दिवसांची वाढ झाल्याने त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी होईल. पुढील आठवडा दिवाळीमुळे कोर्टाचे नियमित कामकाज बंद राहणार आहे.

 

आज कोर्टासमोर ईडीच्या वकिलांनी तक्रार केली की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना जेव्हा जेव्हा सुनावणीसाठी कोर्टात येतात, तेव्हा ते कोर्टाच्या बाहेर उभे असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतात, त्यांच्याशी राजकीय संवाद साधतात, राजकीय वक्तव्ये करतात. तिथे गर्दी होते. सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यावर कोर्टाने ईडीला कठोर शब्दात झापले.

 

कोर्टाने म्हटले, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे ही राजकीय केस नाही. मग राऊत लोकप्रतिनिधी आहेत,
ते जर कोर्टाबाहेर मीडियाशी बोलले तर तुम्हाला नेमकी काय अडचण आहे? राऊतांच्या मीडियाशी बोलण्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या पोटात का दुखतंय?

कोर्टाने असा सवाल केल्यानंतर ईडीच्या वकीलांनी म्हटले की, आम्हाला हरकत नाही, पण त्यांच्या मीडियाशी बोलल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
त्यावरही कोर्टाने कडक शब्दात ईडीच्या वकिलांना सुनावत म्हटले की, इथे काय गोळीबार होईल का? तसे असेल तर लेखी द्या, मग मी त्यावर निर्णय घेईन.
आम्ही बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. इतर आरोपींना चहा प्यायला नेतात, डबा खातात.
मग जर राऊत राजकीय विधान करत असतील तर ईडीला काय अडचण आहे कारण ही राजकीय केस नाही,
असे ईडीचेच म्हणणे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोर्टाने पुढे म्हटले की, कोर्टाच्या बाहेरच्या गर्दीवर मी नियंत्रण आणू शकत नाही.
कोर्टाबाहेर लोक राऊतांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, जर कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या बोलण्याचा नक्की कुणाला त्रास होतोय,
आणि ईडीच्या माध्यमातून राऊतांच्या बोलण्यावर कुणाला अडकाळी आणायची आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | hearing on the bail plea of shivsena uddhav balasaheb thackeray leader mp sanjay raut adjourned now hearing will be held on november 2 raut judicial custody extended till then

 

हे देखील वाचा :

Ghatkopar Crime | दुर्देवी ! कोंडेश्वर धबधब्यात बुडून घाटकोपरच्या 4 तरुणांचा मृत्यू

Pune Crime | कोंढव्यात मेफेड्रोन तस्कराला अटक

Aditya Thackeray | शिंदेंसोबत जाणार्‍या आमदारांना का रोखले नाही, आदित्य ठाकरे म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते की स्वत:ला विकेलेले हे लोक…’

 

Related Posts