IMPIMP

Ghatkopar Crime | दुर्देवी ! कोंडेश्वर धबधब्यात बुडून घाटकोपरच्या 4 तरुणांचा मृत्यू

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

घाटकोपर : सरकारसत्ता ऑनलाइन – Ghatkopar Crime | बदलापूर शहराजवळ असलेल्या कोंडेश्वर धबधब्यात (Kondeshwar Water Fall) बुडून घाटकोपरमधील कामराज नगर (Kamraj Nagar, Ghatkopar) येथे राहणाऱ्या ४ तरुणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे चारही तरुण घाटकोपरच्या कामराज नगर येथे राहतात. कोंडेश्वर धबधब्यात पोहण्यास सक्त बंदी आहे. तरी देखील हे चौघे त्या ठिकाणी जाऊन पाण्यात उतरले होते. आणि काळाचा घात त्यांच्यावर झाला. (Ghatkopar Crime)

 

कामराज नगरमध्ये राहणारा आकाश झिंगा याचा आज (दि. 21) वाढदिवस होता. त्यामुळे पार्टी करण्यासाठी त्याच्यासोबत त्याचे अन्य चार मित्र बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर फिरायला गेले होते. या धबधब्यावर पोहण्यास बंदी आहे. तरी देखील चौघे पाण्यात उतरले. दुपारी दीडच्या सुमारास त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी इतरांनी प्रयत्न केला. पण ते हाती लागले नाहीत. यांच्यापैकी प्रतीक हाटे (Pratik Hate) हा एकटाच वाचू शकला आहे. अन्य चौघांचा मृत्यू झाला आहे. (Ghatkopar Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आकाश झिंगा (Akash Zinga), सुरज साळवे (Suraj Salve), स्वयंम मांजरेकर (Swayam Manjrekar) आणि लिनस उच्चपवार (Linas Ucchapawar) अशी चौघांची नावे आहेत. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत चौघांना वाचविण्याचे प्रयत्न झाले. परंतु तोपर्यंत बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. चौघांचे मृतदेह बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

 

कोंडेश्वर धबधबा खोल असल्याने आणि पाणी जास्त असल्याने या ठिकाणी पोहण्यास आणि पर्यटनास मनाई आहे.
तसेच याठिकाणी पर्यटक जाऊ नयेत, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येतो.
पण गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर पोलीस बंदोबस्त काढण्यात आला होता.
तरी देखील हे तरुण येथपर्यंत पोहोचले कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

कोंडेश्वर धबधब्यात पाण्याचे प्रमाण कमी असले, तरी येथे मोठ्या प्रमाणात कपारी आहेत.
या कपारीत अडकून यापूर्वी देखील अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळेचमुळे कोंडेश्वर धबधब्यावर पोहण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
असे असताना देखील हे तरुण त्या ठिकाणी पोहोचलेच कसे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ghatkopar Crime | Durdevi! 4 youths of Ghatkopar drowned in Kondeshwar falls

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यात मेफेड्रोन तस्कराला अटक

Aditya Thackeray | शिंदेंसोबत जाणार्‍या आमदारांना का रोखले नाही, आदित्य ठाकरे म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते की स्वत:ला विकेलेले हे लोक…’

Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट

 

Related Posts