IMPIMP

Sanjay Raut | ‘सामना कार्यालयात संजय राऊतांना पैसे घेताना मी पाहिलंय’, मुख्य साक्षीदाराचा खळबळजनक दावा

by nagesh
Sanjay Raut | i saw sanjay raut taking money directly from the front man pravin raut employee in the samana office says swapna patkar in ed inquiry marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार (Patra Chawl Scam) प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. या कथित घोटाळ्याचा पैसा संजय राऊतांनी (Sanjay Raut) कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या नावाने विविध बनावट कंपन्यामध्ये गुंतवल्याचे ईडीच्या तपासात (ED Investigation) समोर आले. यानंतर 1 ऑगस्टला संजय राऊतांना अटक (Arrest) करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर (Main Witness Swapna Patkar) यांच्याकडे ईडीने चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी सांगितले की, एप्रिल 2021 मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये संजय राऊतांचे (Sanjay Raut) व्यावसायिक हितसंबंध असल्याचा दावा पाटकर यांनी केला. संजय राऊतांनी बेहिशेबी रोकड वापरुन पत्नी आणि कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावे जमीन खरेदी (Purchase of Land) केल्या. कोणत्याही गॅरंटीशिवाय त्यांनी नातेवाईकांकडून कर्जाच्या नावाखाली पैसे घेतले. आई, भाऊ, चुलत भाऊ आणि इतर लोकांकडून राऊतांनी कर्ज घेतले ज्यांच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही स्त्रोत नाही.

 

 

पण राऊतांचा प्लॅन फसला

 

स्वप्ना पाटकर यांनी दावा केला आहे की, प्रविण राऊतांच्या (Pravin Raut) दोन कर्मचाऱ्यांनी संजय राऊतांना पैसे दिले होते असा दावा ईडीच्या तपासात पाटकर यांनी केला. अलिबाग येथे खरेदी केलेल्या जमिनीवर संजय राऊतांना रिसॉर्ट बांधायचं होतं. मात्र त्याठिकाणी असलेल्या सीआरझेड निकषांमुळे हा प्लॅन त्यांचा फसला.

 

 

प्रविण राऊतांच्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले

 

2008 ते 2014 या काळात मी शिवसेनंच मुखपत्र असलेल्या सामनात (Samana) स्तंभलेखिका होते. राऊतांना इंग्रजीत लेख लिहण्यास मदत करत होते. राज्यसभेच्या कामातही मी त्यांना मदत केली. या काळात या प्रकरणातील आरोपी प्रविण राऊत यांचे दोन कर्मचारी सामना कार्यालयात आले आणि थेट संजय राऊतांना पैसे सोपवताना पाहिलं असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रविण राऊत ‘फ्रंट मॅन’

 

ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रविण राऊत हा संजय राऊतांचा ‘फ्रंट मॅन’ म्हणून काम करत होता.
पत्राचाळ प्रकरणात साक्षीदाराने सांगितले की, 2008-09 या दरम्यान परिसरात राहणाऱ्यांनी चाळीच्या
पुनर्विकासासाठी स्थानिक नेत्याच्या मदतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)
यांच्याशी संपर्क साधला होता. अनेक बैठकानंतर एचडीआयएलचे राकेश वाधवान (Rakesh Wadwan) यांच्या
सोबत योजना पूर्ण करण्यास संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना सांगण्यात आले.
प्रविण राऊत हे संजय राऊतांच्या वतीने काम करत होते आणि HDILकडून मिळणाऱ्या पैशातून प्रत्येक महिन्याला
दोन लाख रुपये संजय राऊतांना दिले जात असल्याचे साक्षीदाराने सांगितले.

 

 

चित्रपटाच्या माध्यमातून नफा दाखवला

 

राऊत यांनी एंटरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या (Entertainment LLP Company) माध्यमातून ‘ठाकरे’ चित्रपट (Thackeray Movie) काढला.
या चित्रपटात राऊतांनी बेहिशेबी पैसे वापरले. मराठी सिनेमाच्या माध्यमातून नफा मिळत असल्याचे दाखवून त्यांनी
50 लाख रुपये घेतले. यानंतर 2015 मध्ये ‘बाळकडू’ (Balkadu Movie) हा चित्रपट रिलीज झाला.
या चित्रपटाने 60 लाख रुपये नफा कमावला.
त्यापैकी राऊतांनी 50 लाख रुपये माझ्या बँकखात्यातून मला चेक देण्यास भाग पाडले.
त्यांच्या नावाने चेक काढला. या चित्रपटासाठी त्यांचे कोणतेही योगदान नव्हते.
त्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतल्याचे स्वप्ना पाटकर यांनी ईडीला सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Sanjay Raut | i saw sanjay raut taking money directly from the front man pravin raut employee in the samana office says swapna patkar in ed inquiry marathi news

 

हे देखील वाचा :

MNS On NCP -Shivsena | मनसेची सेना-राष्ट्रवादीवर टीका, शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील मांजर, आधी…

Comedian Raju Srivastava Passed Away | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | ‘ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है’; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंसह विरोधकांवर साधला निशाणा

M.R.Poovamma | आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या ‘या’ भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

 

Related Posts