IMPIMP

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | ‘ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है’; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंसह विरोधकांवर साधला निशाणा

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray to be in thane first time in eknath shinde home ground after shivsena crisis

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन   CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच जळगावच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये जाहीर सभा घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आज शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना चालत नाही. मात्र, जनेतेने आम्हाला स्वीकारलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी जाहीर सभेत नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे आणि विरोधकांना ओपन चॅलेंजच दिले. (CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल एकनाथ शिंदेनी उपस्थितांना केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय. गेल्या अडीच वर्षात जी कामं झाली नाहीत, ती केवळ अडीच महिन्यात आम्ही पूर्ण करत आहोत. त्यामुळेच, ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला यश मिळालंय, लोकांनी अडीच महिन्यातच आपल्याला स्विकारलंय. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत हे यश तुमचं आहे, तुम्ही काम केलंय. ग्रामंपायतीमधील यश म्हणजे ये तो सिर्फ झाँकी है… गुलबरावांनी आत्ता म्हटलंय. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है… असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

राष्ट्रवादीला शिवसेना पक्ष गिळायचा होता.
शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात विरोधकांना राष्ट्रवादीकडून ताकद दिली जात होती.
याबाबत आम्ही शिवसेना प्रमुखांशी अनेकदा बोललो, आमदार माझ्याकडे येत होते, मला अडचण सांगत होते.
मीही 5 वेळा त्यांना बोलून दाखवलं, झालं ते झालं आत्ता फिटानफिट्ट झाली. आपण, भाजपसोबत जायला हवं, असे आम्ही त्यांना यावेळी सांगितले. मात्र त्यांनी काही ऐकले नाही. झोपलेल्यांना उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर यावेळी निशाणा साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | the gram panchayat is just a tableau chief minister eknath shinde directly targeted the opposition including thackeray

 

हे देखील वाचा :

M.R.Poovamma | आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या ‘या’ भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

Pune Crime | पुणे स्टेशनला जाण्यास नकार देणार्‍या कॅबचालकावर चाकू हल्ला करणार्‍याने पोलिसांना केले जखमी

T-20 World Cup | T-20 वर्ल्डकप आधी ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

 

Related Posts