IMPIMP

MNS On NCP -Shivsena | मनसेची सेना-राष्ट्रवादीवर टीका, शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील मांजर, आधी…

by nagesh
MNS On NCP -Shivsena | shiv sena is sharad pawars caged cat in the zoo mns leader sandeep deshoande snarky criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS On NCP -Shivsena | सध्याची शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर झाली आहे. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर झाली आहे. ठाकरेंनी कितीही मेळावे घेतले तरी तुमच्याकडे विचार आहेत का, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी केली. यावेळी देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. (MNS On NCP -Shivsena)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संदीप देशपांडे म्हणाले, शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणताहेत. आधी स्वत: काय आहात ते पाहा. शिवसेनेचे औरंगाबादमधील नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर टीका करताना देशपांडे म्हणाले, शिवसेनेचे औरंगाबादमधील नेतृत्व हे आऊटडेटेड झालेले आहे. दानवे असतील वा खैरे असतील, तेथील नेते हे आऊटडेटेड झाले आहेत. (MNS On NCP -Shivsena)

 

मनसेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देताना देशपांडे म्हणाले,
आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवतेय त्याचे काय, त्याबाबत जयंत पाटील काय बोलणार
आहेत का, असा सवाल देशपांडे यांनी केला. दरम्यान, राज ठाकरे यांनी विदर्भ दौरा सुरू केला असताना मनसेच्या
नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका सुरू केली आहे.

 

Web Title :-  MNS On NCP -Shivsena | shiv sena is sharad pawars caged cat in the zoo mns leader sandeep deshoande snarky criticism

 

हे देखील वाचा :

Comedian Raju Srivastava Passed Away | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | ‘ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है’; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंसह विरोधकांवर साधला निशाणा

M.R.Poovamma | आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या ‘या’ भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

 

Related Posts