IMPIMP

Sanjay Raut | ज्या पक्षाचे चिन्ह गोठवले ते पक्ष मोठे झाले, आम्हीही मोठे होऊ; संजय राऊतांचा तुरुंगातून ऐल्गार

by nagesh
Sanjay Raut | opposition mahamorcha sanjay raut on the 17th the mahamorcha will start no- one will be able to stop it sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेची (Shivsena) तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत (Sanjay Raut) सध्या पत्राचाळ घोटाळा
प्रकरणात (Patrachal Land Scam) तुरुंगात आहेत. सध्या शिवसेना पक्ष कोणाचा यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray
Group) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) तात्पुरते
गोठवलं आहे. संकट काळात नेहमीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे आणि पक्षाची बाजू मांडणारे संजय
राऊत (Sanjay Raut) हे मोठ्या घडामोडीवेळी तरुंगात (Jail) आहेत. आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांनी तुरुंगातून प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेचे नावं चिन्ह क्रांती घडवून आणेल. आधी ज्या पक्षांची चिन्हं गोठवलं गेली ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ, असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात असून त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. राऊत हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सक्रिय नसले तरी त्यांचे तुरुंगातूनच राजकीय घडामोडीवर बारीक लक्ष आहे. तुरुंगात दररोज सकाळी येणाऱ्या वर्तमान पत्रांच्या माध्यमातून संजय राऊत राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

 

काय म्हणाले संजय राऊत?

आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे. भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ आणि सेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. चिन्ह गोठवण्याची वेळ अनेक पक्षांवर आलीय. आधी ज्यांचं चिन्ह गोठवलं गेलं ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ, असे संजय राऊत म्हणाले.

 

शिंदेंकडून ठाकरेंवर कुरघोडी

शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या तीन पर्यायमध्ये ठाकरे गटाच्या यादीतील त्रिशूल (Trishul) आणि उगवता सूर्य (Rising Sun) या दोन पर्यायांचा समावेश केला आहे. आता दोन्ही गटांकडून सारख्याच चिन्हांची (Shivsena New Symbol) मागणी केल्यामुळे ही दोन्ही चिन्ह आता निवडणूक आयोग बाद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पसंतीची तीन चिन्ह पाठवली आहेत.
यात त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा Gada (Mace) यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे यांनी देखील त्रिशुल, उगवता सूर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
त्यामुळे ठाकरे गटाने मागितलेल्या चिन्हांवरच शिंदे गटाने दावा करत निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | this is not the first time that shivsena new logo will create a revolution says sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अकाऊंटंटनेच घातला 31 लाखांचा गंडा; दिलेल्या पासवर्डचा वापर करुन वळविले स्वत:च्या खात्यात पैसे

Shivsena New Symbol | एकनाथ शिंदेंनी केली उद्धव ठाकरेंची कोंडी? ‘या’ दोन चिन्हांची निवडणूक आयोगाकडे केली मागणी

Sangli Crime | आईसह तीन मुलींचे तलावात आढळले मृतदेह, पतीवर संशय; जत तालुक्यात खळबळजनक घटना

Pune Cyber Crime | मोबाईलवरुन हॉटेल बुकींग पडले एक लाखाला; दत्तवाडी परिसरातील घटना

 

Related Posts