IMPIMP

Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser | ‘सेल्फी’ चित्रपटातील ‘कुडीये नी तेरी’ गाण्याचा टीझर आउट; मृणालच्या ग्लॅमरस अंदाजाने वेधले सर्वांचे लक्ष

by nagesh
selfiee song kudiyee ni teri teaser release akshay kumar flaunts six pack abs dances with mrunal thakur

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser | नुकताच बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा
आगामी चित्रपट सेल्फीचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. आता या चित्रपटातील ‘कुडीये नी तेरी’ या गाण्याचा
टीझर प्रदर्शित झाला आहे. त्या टीझरने देखील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर ‘कुडीये नी तेरी’ या गाण्याचा 17 सेकंदाचा टिझर सध्या
सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘कुडीये नी तेरी’ या गाण्याच्या टीझर मध्ये अक्षय आणि मृणाल ठाकूरची केमिस्ट्री खूपच चांगली दिसत आहे. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या गाण्यांमध्ये अक्षयच्या सिक्स पॅकने आणि मृणालच्या ग्लॅमरस लुकने अनेकांची मन जिंकली आहेत. अक्षयने या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की “‘रेडी टू रॉक विथ ‘कुडीये नी तेरी’? गाणं 9 फेब्रुवारी रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस.’ सध्या अक्षयने शेअर केलेल्या या टीझरवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने कमेंट करत म्हणाले ‘खिलाडी इज बॅक’ तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले “चांगलं गाणं आहे”.

 

 

अक्षयचा सेल्फी हा चित्रपट येत्या 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
तर या चित्रपटात अक्षय आणि मृणाल सोबत इम्रान हाश्मी नुसरत भरुचा हे देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. ज्यांनी गुड न्यूज या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते.
तर अक्षयच्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- selfiee song kudiyee ni teri teaser release akshay kumar flaunts six pack abs dances with mrunal thakur

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील ‘सायबर सेल’चा मोबाईलधारकांना दिलासा, हरवलेले मोबाईल परराज्यातून जप्त करुन केले परत

Pune PMC News | पुणे महापालिकेने दहा महिन्यांत तब्बल 750 बेकायदा होर्डींग हटविले; थकबाकी असलेल्या 135 प्रकरणांत मिळकतींच्या मिळकत करावर चढविला बोजा

 

Related Posts