IMPIMP

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

by nagesh
senior citizens get these tax benefits you ever availed the benefit know everything

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Senior Citizens Get These Tax Benefits | सरकार 60 ते 80 वर्षापर्यंत वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्समध्ये सूट देते. तर 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना सुपर सिनिअर सिटीझन म्हटले जाते. ज्यात ज्येष्ठ नागरिकांपेक्षा जास्त लाभ मिळतात. जर तुमच्या घरात कुणी सिनिअर सिटीझन किंवा सुपर सिनिअर सिटीझन असेल तर कशाप्रकारे इन्कम टॅक्समध्ये फायदा मिळू शकतो (which tax benefits get to senior citizens), ते जाणून घेवूयात. (Senior Citizens Get These Tax Benefits)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1. इन्कम टॅक्स सवलतीची मर्यादा (Limit of income tax relief) –

 

सध्या 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना वार्षिक 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही.
तर सिनिअर सिटीझनसाठी ही मर्यादा 3 लाख रुपये आणि सुपर सिनिअर सिटीझनसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.
ज्याचा थेट अर्थ आहे की, वार्षिक इतक्या उत्पन्नवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.

 

2. गुंतवणुकीवर मिळणार्‍या व्याजावर सूट (Discount on interest earned on investments) –

 

सिनिअर सिटीझन आयुष्यभर केलेली सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट करून त्यामधून मिळणार्‍या व्याजातून आपला खर्च चालवतात.
अशावेळी सिनिअर सिटिझनला 80TTB अंतर्गत फायनान्शियल ईयरमध्ये 50 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत मिळते. यातून अतिरिक्त उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागतो.

3. मेडिकल इन्श्युरन्स प्रीमियमवर डिडक्शन (Deduction on medical insurance premium) –

 

सिनिअर सिटीझनला एक वर्षात 50 हजार रुपयांपर्यंत मेडिकल इन्श्युरन्सवर डिडक्शनचा फायदा मिळू शकतो.
ज्यामध्ये सिनिअर सिटीझनला इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80D नुसार सूट मिळते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

4. वैद्यकीय खर्चावर कर सवलत (Tax relief on medical expenses) –

 

सिनिअर सिटीझनकडून वर्षभरात जो मेडिकल खर्च होता त्यावर कर सवलत मिळते.
प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 डीडीबी अंतर्गत एक सिनिअर सिटीझन 1 लाख रुपयांपर्यंतच्या मेडिकल खर्चावर डिडक्शनचा लाभ घेऊ शकतो.

 

Web Title : senior citizens get these tax benefits you ever availed the benefit know everything

 

हे देखील वाचा :

Solapur Crime | धक्कादायक! मोहोळ तालुक्यातील नवोदय विद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नातेवाईकांचा रास्ता रोको

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts