IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | शिंदे-फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी, शरद पवारांनी सांगितला भू विकास बँकेचा इतिहास

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shinde showered praise on sharad pawar in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात परतीचा पाऊस दिवाळसणावर (Rain in Maharashtra) विरझन घालून गेला. त्यामुळे सर्व विरोधी
पक्षांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) सरकारवर टीका केली आहे. भू विकास बँकेतील कर्जमाफी (Loan Waiver) म्हणजे निव्वळ खोटपणा आहे, असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भू विकास बँकेच्या (Bhuvikas Bank) कर्जमाफीबाबत शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Government) केला जाणार दावा खोटा आहे. आम्ही भू विकास बँकेतून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ केल्याचे सरकार सांगत आहे. पण मला इथे बसलेल्या एका तरी माणसाने सांगावे की, गेल्या दहा वर्षात एका तरी शेतकऱ्याला भू विकास बँकेचे कर्ज मिळाले आहे का? बँक अस्तित्वात आहे हे कोणाला माहीत आहे का? भू विकास बँक एकेकाळी होती. पण आता ती राज्यात कार्यरत नाही. गेल्या 25 – 30 वर्षात बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली झालेली नाही. ही वसुली होणार नाही, हे कळल्यावर राज्य सरकारने (State Government) घोषणा केली आहे. लबाडाच्या घरचे आवताण जरी आले, तरी जेवल्याशिवाय खरे नसते. असाच एकंदरीत प्रकार आहे, असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

राज्यातील भू विकास बँकेच्या सुमारे 35 हजार शेतकऱ्यांचे 946 कोटींचे कर्ज माफ केल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे सरकारचा दावा खरा की शरद पवारांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
त्याचमुळे आता आगामी काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले की, नाही यावर सर्व काही अवलंबून आहे.

 

Web Title :- Senior citizens soft target in PMPL bus travel; Gang of women robbers active

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वास्तुशास्त्र सल्लागाराचे मित्रानेच केले अपहरण, बिबवेवाडी परिसरातील घटना

CM Eknath Shinde | भारत-पाकिस्तान सामन्यात मेलबर्नवर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पोहोचली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Crime | एसटी प्रवासी नियंत्रकाला एजंटकडून जीवे मारण्याची धमकी, स्वारगेट एसटी स्थानकातील घटना

 

Related Posts