IMPIMP

CM Eknath Shinde | भारत-पाकिस्तान सामन्यात मेलबर्नवर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पोहोचली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by nagesh
CM Eknath Shinde | balasahebs shivsena reached melbourne stadium in indpak match say cm eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन रविवारी (दि. 23) रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न (Melbourne, Australia) स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना झाला. यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक गजब दावा केला आहे. काल झालेल्या सामन्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते गेले होते. त्यांच्या हातात बॅनर होते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे.

 

ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या वेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आम्ही ठरवले, सर्व सण साजरे करायचे. मग गोविंदा असो, दसरा असो किंवा दिवाळी असो. आपण पाकिस्तान विरोधातील सामना जिंकलो. यावर सर्व भारतीयांना जल्लोष केला. मेलर्बन येथे बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) पक्षाचे कार्यकर्ते पोहोचले होते. यावेळी त्यांच्या हातात आमच्या पक्षाचे बॅनर होते. आम्ही देखील तीन महिन्यांपूर्वी एक सामना जिंकला आहे. राज्यात परिवर्तनाचे सरकार आले आणि राज्यात विकासपर्व सुरु झाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेलबर्न स्टेडियमवर (Melbourne Stadium) सामन्यादरम्यान, एक तरुण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पोस्टर घेऊन उभा असल्याचा फोटो समाज माध्यमांवर प्रसारीत झाला आहे. ‘वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे – बाळासाहेबांची शिवसेना दिवा शहर’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिला होता.
या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray),
धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते.

 

Web Title :- CM Eknath Shinde | balasahebs shivsena reached melbourne stadium in indpak match say cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

MLA Bhaskar Jadhav | डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भास्कर जाधवांना दिलासा, पुणे न्यायालयाकडून ‘या’ दोन अटींवर हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

Pune Crime | पुण्यात चोरट्यांची दिवाळी जोरात, कर्वेनगर, हडपसरमध्ये घरफोडी; 15 लाखांचा ऐवज लंपास

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना आता घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरायला गेले, भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघात

Pune Crime | कात्रज परिसरातील मांगडेवाडीतून 10 लाखांचा चरस जप्त, तस्कराला अटक

 

Related Posts