IMPIMP

Shalini Thackeray | ‘पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले, आता कोण एकटे पडले’ – शालिनी ठाकरे

by nagesh
Shalini Thackeray | mns leader shalini thackeray tweet on former mayor kishori pedanekar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shalini Thackeray | विधान परिषदेच्या निवडणूकीत (Maharashtra MLC Election) भाजपचे पाच उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराच्या पराभवामुळे धक्का बसला आहे. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये नाट्य असतानाच शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्र हादरून सोडला आहे. शिंदेंसह काही आमदार नाॅट रिचेबल आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. अशातच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी ट्विट करत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“सबको समजा… आपको समजा क्या ? पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले. आता कोण एकटे पडले हे समजले असेलच. तुमच्यात एकजूट किती आहे, हे सगळ्यांना समजले. पण तुम्हाला कधी समजणार ?,” असा सवाल शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना केला आहे. ‘एकनाथ महाराज की जय !! मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे.’ असं त्या म्हणाल्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दीपाली ताई स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या..
“या स्वत:च्या वाक्याचा विसर पडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज एकनाथ महाराज नक्कीच आठवले असतील. दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या,” असा सल्ला शालिनी ठाकरे यांनी दीपाली सय्यद यांना दिला आहे.

 

Web Title :- Shalini Thackeray | Once again the Chief Minister was hit in the face now who is left alone Shalini Thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वडिलांना मारहाण करून पसार झालेल्या मुलाला व जावयाला गुन्हे शाखेकडून अटक

Sanjay Raut | संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले – ‘आमच्या आमदारांचा खूनही होऊ शकतो’

Sodium Deficiency Symptoms | ‘या’ लक्षणांमुळे शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होऊ शकते; जाणून घ्या

 

Related Posts