IMPIMP

Shinde Government Expansion | शिंदे सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

by nagesh
Shinde Government Expansion | maharashtra politics expansion of the state cabinet portfolio after the winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिंदे सरकारला कैचीत पकडण्यासाठी विरोधकांचा आवडता मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार (Shinde Government Expansion). त्यामुळे शिंदे सरकारला अनेकदा विरोधकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. येत्या 19 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार (Shinde Government Expansion) होणार होता. तशी चर्चा मागील काही काळ होती. पण हा मंत्रिमंडळ विस्तार आता लांबणीवर पडणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस हिवाळी अधिवेशनानंतर उजाडणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती सोय केली आहे. राज्यातील काही खाती शिंदे गटातील मंत्र्यांना देण्यात आली आहेत. सध्या राज्यातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह 20 मंत्री आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त खात्यांचा भार आहे. यात एकनाथ शिंदे गटाच्या 9, तर भाजपच्या 9 मंत्र्यांकडे कारभार दिला गेला आहे. राज्यातील महत्त्वाच्या खात्यांना अद्याप मंत्री नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्ष करत आहेत. तसेच एकाच मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती असल्याने कामात अडथळे येतात, असेदेखील विरोधकांचे मत आहे.

 

शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या आशेने बंडात सामील झाले होते.
त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Shinde Government Expansion) संधी न मिळाल्याने ते
नाराज आहेत. तसेच मंत्रिपदावरून सध्या धुसफूस सुरू आहे. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराकडे आमदारांचे लक्ष लागले होते.

 

Web Title :- Shinde Government Expansion | maharashtra politics expansion of the state cabinet portfolio after the winter session

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक

Malaika Arora | मलायका अरोराचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; स्टँडअप कॉमेडी करत दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

 

Related Posts