IMPIMP

Malaika Arora | मलायका अरोराचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; स्टँडअप कॉमेडी करत दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

by nagesh
Malaika Arora | moving in with malaika actress malaika arora says i want divorce nameplate outside of house

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या मलायका चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिचा मूव्हिंग इन विथ मलायका’ शो. या शोमध्ये तिने आत्तापर्यंत तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा त्या शोमध्ये मलायका अरोरा (Malaika Arora) स्टँडअप कॉमेडी करताना दिसणार आहे. यासंदर्भातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या आयुष्यातील काही गोष्टी ती या व्हिडिओ मध्ये सांगताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका (Malaika Arora) ट्रोलर्सना चांगलेच प्रत्युत्तर देताना दिसत आहे. यावेळी ती म्हणते या मॉडर्न जगात घटस्फोट हा शब्द अजूनही लोकांसाठी खूप मोठा आहे. आज माझ्या घटस्फोटाला इतकी वर्षे झाली तरीदेखील मला एक घटस्फोटीत महिला म्हणूनच बघितले जाते. घटस्फोटानंतर मी माझ्या आयुष्यात पुढे गेले आनंदी आहे सुखी आहे. एवढेच काय तर माझा पूर्वाश्रमीचा पतीदेखील तो त्याच्या जीवनात सुखी आहे. मात्र लोकांना हे बघवत नाही. आता माझ्या घराच्या समोर केवळ घटस्फोटीत अशी पाटी लावण्याची बाकी राहिल्याचे दिसते”. याशिवाय तिने तिच्या आणि अर्जुनच्या नात्यावर ही भाष्य केल्याचे दिसले.

 

 

ती म्हणाली, “मी वयाने खूप मोठी आहे, पण मी माझ्या फिटनेसमुळे तशी दिसत नाही यात माझी चूक नाही.
हा मी माझ्या वयापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीला डेट करत आहे.
पण तो इतकाही लहान नाही की मी त्याला माझ्यासोबत डेट करताना क्लास बंक करायला सांगत आहे किंवा कॉलेज बुडवायला सांगत आहे.
तो तेवढा समजूतदार व्यक्ती आहे. आम्ही एकमेकांना पोकोमॅन गेम खेळताना भेटलेलो नाही आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो.
तो एक मर्द आहे”. सध्या मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Malaika Arora | moving in with malaika actress malaika arora says i want divorce nameplate outside of house

 

हे देखील वाचा :

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

 

Related Posts