IMPIMP

Shinde Group | पहिले पर्याय रद्द झाल्याने शिंदे गटाने पुन्हा पाठवली ही 3 चिन्ह, निवडणूक आयोगाला अखेरच्या क्षणी केला ई-मेल

by nagesh
Shinde Group | balasahebs shivsena finally sent an e-mail to the election commission for 3 symbols

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिंदे गटाला (Shinde Group) निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नाव मिळाले असले तरी अद्याप
निवडणूक चिन्ह (Election symbol) मिळालेले नाही. चिन्हासाठी निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूकडून पर्याय मागवले होते. मात्र, शिंदे गटाने यापूर्वी
दिलेले तिन्ही पर्याय आयोगाने रद्द ठरवल्याने अखेरच्या क्षणी इमेलद्वारे पुन्हा 3 पर्यायी चिन्ह पाठवल्याने विलंब झाला आहे. शिंदे गटाने (Shinde Group)
शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्ह दिल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेला (Shivsena) नवे नाव शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे
(Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) असे मिळाले आहे, तर धगधगती मशाल हे पक्षचिन्ह मिळाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ शिंदे गटाला (CM Eknath Shinde Group) ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasaheb of Shivsena) हे नाव आयोगाने दिले. शिंदे गटाने यापूर्वी आयोगाकडे त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा हे चिन्हासाठी पर्याय दिले होते ते रद्द ठरवल्याने आता पुन्हा ईमेलद्वारे चिन्हांसाठी पर्याय पाठवले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) जारी केलेल्या मुक्त चिन्हांऐवजी नवीन चिन्हांचा पर्याय देण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हे सादर केली आहे.

 

निवडणूक आयोगाने शिंदे गटाने (Shinde Group) यापूर्वी पाठवलेली त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह रद्द केली.
त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती.
धार्मिक चिन्ह असल्याने निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आणि पुन्हा तीन चिन्ह देण्यास सांगितले.

 

शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena chief Balasaheb Thackeray) यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाला.
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shinde Group | balasahebs shivsena finally sent an e-mail to the election commission for 3 symbols

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; एका तरुणावर FIR

Pune Crime | सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिक गेला घर सोडून; सावकारावर FIR

Pune PMC News | कात्रज-कोंढवा ते टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणारा रस्ता; 24 मीटर ऐवजी 10 मीटर रुंदीचाच होणार; भूसंपादनातील अडचणींमुळे महापालिकेचा निर्णय

 

Related Posts