IMPIMP

Pratap Sarnaik | डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार तर ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री; रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले – प्रताप सरनाईक

by nagesh
Pratap Sarnaik | the rickshaw puller of dombivali is the mla and the rickshaw puller of thane is the chief minister pratap sarnaik

ठाणे :  सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात घडलेल्या सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पाडली आणि 40 हून जास्त आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदारांपैकी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे नाव घेतले जाते. दरम्यान प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी माध्यमांशी संवाद साधताना डोंबिवलीचा (Dombivli) रिक्षावाला (Rickshaw Puller) आमदार झाला तर ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

 

आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) वाढत होती. त्यामुळे आमदारांच्या मनातील खदखद मी पत्रद्वारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या कानावर घातली होती. त्यावेळी त्या पत्राची दखल घेतली नाही. मात्र मला या गोष्टीचा आनंद वाटत आहे की, त्या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी (Independent MLA) घेतली. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आलोय. डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे तर ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खऱ्या आर्थाने सुगीचे दिवस आले
ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). ईडीचे सरकार राज्यात आले आहे. कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात हक्क भंग मांडला. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी आवाज उठवला. त्यावेळी जी मदत सहकार्य मिळाले पाहिजे होते, ते मिळालेले नाही. वाढदिवसाच्या दिवशी फोटो देखील काढायला मिळाला नाही. सीआरपीएफ जवान आता माझ्या सुरक्षेसाठी आहेत. कालचक्र कधी फिरेल हे सांगता येत नाही. खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आले आहे. माझ्या मतदार संघाला 300 कोटींचा निधी दिला, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

 

न्यायालयीन प्रक्रिया चालूच राहील
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कोण देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आहेत का? ते विरोधी होते,
तेव्हा त्यांनी माझ्यावरती आरोप केले आणि त्यांच्या आरोपाला मी प्रत्युत्तर दिले.
त्यांनी माझ्यावरती केस दाखल केली आहे. मी पण त्यांच्यावरती केस दाखल केली आहे.
त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया चालूनच राहील, असे सरनाईक यांनी सांगितले.

 

Web Title :- Pratap Sarnaik | the rickshaw puller of dombivali is the mla and the rickshaw puller of thane is the chief minister pratap sarnaik

 

हे देखील वाचा :

GST | नॉन – ब्रँडेड खाद्यान्न वस्तूंवर लगू होणार्‍या GST संदर्भात शुक्रवारी राज्यव्यापी व्यापारी परिषद

Aditya Thackeray | ‘गद्दार हे गद्दार असतात, ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दार उघडे’ – आदित्य ठाकरे

Raj Babbar | कोर्टाचा मोठा निर्णय ! अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा

 

Related Posts