IMPIMP

Shirur Lok Sabha | शिरूर लोकसभेचा राष्ट्रवादीमधील वाद मिटला?, विलास लांडे म्हणाले-‘अमोल कोल्हे यांना…’

by nagesh
Shirur Lok Sabha | former mla vilas lande statement that only amol kolhe has another chance from shirur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शिरुर लोकसभा मतदारसंघावर (Shirur Lok Sabha) राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Bhosari Former MLA Vilas Lande) यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (NCP) शिरुरमधून कोणाला संधी (Shirur Lok Sabha) देणार याबबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha) पुन्हा एकदा अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांना संधी मिळली आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

शिरुर मतदारसंघात (Shirur Lok Sabha) राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला असून पुन्हा एकदा अमोल कोल्हेच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. बैठकीत शरद पवार यांनी सर्वांसमोरच अमोल कोल्हे यांना तुम्ही पुन्हा लढणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अमोल कोल्हे यांनी देखील हो असे उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पुण्यातील निसर्ग मंगल कार्य़ालयात येथे होत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe), माजी आमदार विलास लांडे, आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांच्यासह माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या बैठकीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे
यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विलास लांडे म्हणाले, शिरुर लोकसभा मतदार संघातील आढावा शरद पवार
यांनी जाणून घेतली. त्यावेळी अमोल कोल्हे यांना पुन्हा शिरुरमधून निवडणूक लढवावी लागेल असे आदेश दिले असल्याचे लांडे यांनी सांगितले.

Web Title : Shirur Lok Sabha | former mla vilas lande statement that only amol kolhe has another chance from shirur

Related Posts