IMPIMP

Shivajirao Adhalrao Patil | संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसलाय, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे वक्तव्य

by nagesh
Shivajirao Adhalarao Patil | shirur shivsena ex mp Shivajirao Adhalarao Patil criticism of ncp at pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढत आहे. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील ठाकरे सरकारची (Thackeray Government) साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. अनेक बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीची (NCP) साथ सोडून भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी देखील एक वक्तव्य केले आहे. तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय, असे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुण्यातील चाकण येथे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यात सर्वात जास्त, तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय. साधी गोष्ट सांगतो, गेल्या तीन दिवसांपासून ऐकतोय, 150-200 जीआर एक दोन दिवसांत काढलेत. पुणे जिल्ह्याच्या डीपीडीसीचा 170 कोटी रुपयांचा फंड एकतर्फी शिरुरच्या खासदारांना 15 कोटी, बारामतीच्या खासदारांना 18 कोटी, जुन्नरच्या आमदारांना 10 कोटी, खेडच्या आमदारांना 12 कोटी अशा 178 कोटींचे प्रस्तवा मंजूर करुन सहीला गेलेत.

 

हे प्रस्ताव मंजूर करताना जिल्हा परिषदेचे सदस्य नाही, मंत्री नाहीत, कोणाला काही विचारलं नाही.
कोणाचं काही अपील नाही. हे काय सुरु आहे? आम्ही किती सहन करायचं याचा विचार व्हायला पाहिजे या मताचा मी आहे
असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. तसेच कोणत्याही परिस्थिती शिवसेना एकत्र राहिली पाहिजे.
आजही आपल्या पक्षावर संकट आले आहे. सर्वांचीच जबाबदारी आहे, पण मी पुढे राहणार. बोटचेपी धोरण करु नये.
कशासाठी लोक तुमच्याकडे येतील, का उभे राहतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Shivajirao Adhalrao Patil | the biggest blow of ncp has fallen on shivsena shivajiroa adhalrao patil maharashtra political crisis uddhav thackeray eknath shinde

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC ने शिवसेनेला सांगितले

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांना SC चा दिलासा ! उपाध्यक्ष झिरवाळांना नोटीस; पुढील सुनावणी 11 जुलैला, जाणून घ्या कोर्टात काय झालं

Women To Ban Physical Relation | महिलांनी पुरुषांविरुद्ध केली सेक्स स्ट्राईकची घोषणा !

 

Related Posts