IMPIMP

Shivpal Singh | भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी; 4 वर्षाची बंदी

by nagesh
Shivpal Singh | javelin thrower shivpal singh fails dope test banned for 4 years sport news

सरकारसत्ता ऑनलाइन  –  शिवपाल सिंगची (Shivpal Singh) गणना भारतातील अव्वल भालाफेकपटूमध्ये केली जाते. गेल्या वर्षी उत्तेजक द्रव्य चाचणीत (Stimulant Testing) अपयशी ठरल्याबद्दल नाडाच्या (Nada) डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने (Anti-Doping Disciplinary Committee) चार वर्षांसाठी शिवपाल सिंगला निलंबित (Suspended) केले आहे. त्यामुळे आता शिवपाल सिंग (Shivpal Singh) याची कारकीर्द संकटात सापडली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Javelin thrower Neeraj Chopra) याच्यानंतर शिवपाल सिंगला हा दुसरा यशस्वी भालाफेकपटू आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्पर्धाबाह्य चाचणीत अपयश आल्यामुळे शिवपाल सिंगला (Shivpal Singh) तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. त्याच्या नमुन्यात मेथेंडिएनोन हे अमली पदार्थ सापडले होते. यानंतर तो स्टेरॉइड मेथेंडिएनोन चाचणीत (Steroid Methandienone Test) तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर अखेर त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली. ऑक्टोबर 2021 ते 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्याचे निलंबन राहणार आहे.

 

शिवपालने दोहा येथील 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 86.23 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले,
जे त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम प्रयत्न होता.
त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील दुसऱ्या पात्रता गटात 76.40 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह 12 वे आणि एकूण 27 वे स्थान पटकावले.
या ऑलिम्पिकनंतर त्याने कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही.
शिवपालने आपल्या खेळाने अनेकदा संपूर्ण देशाची मान उंचावली होती.

 

 

Web Title :- Shivpal Singh | javelin thrower shivpal singh fails dope test banned for 4 years sport news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन घडवून आणला गर्भपात; तरुणाविरुद्ध बलात्काराबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल

Eknath Khadse | मी 50 खोके घेऊन दुसर्‍या पक्षात जाणारा माणूस नाही, एकनाथ खडसे म्हणाले – अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच… माझ्यासोबत…

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

 

Related Posts