IMPIMP

Shivsena | शिवसेनेची राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका; म्हणाल्या – ‘दुसर्‍यांना शिकवण्याआधी पहिले स्वतःकडे पाहावे’

by nagesh
Shivsena | before teaching others look at yourself first shivsena Spokesperson Manisha Kayande criticizes mns chief raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीसाठी केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जबाबदार आहेत, उद्धव
ठाकरे विश्वास ठेवण्याच्या लायक नाहीत, गरज पडल्यास 40 आमदारांच्या पक्षातील समावेशावर विचार करू, इत्यादी वक्तव्य करत मनसे प्रमुख राज
ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. या टीकेला आता शिवसेनेकडून (Shivsena) उत्तर
देण्यात आले आहे. शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे (Spokesperson Manisha Kayande) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मनिषा कायंदे यांनी म्हटले की, मनसेच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. राज ठाकरे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना पुढे का करत आहेत? मनसेचा पुढचा चेहरा म्हणून संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांना पुढे का आणत नाहीत. दुसर्‍यांना शिकवण्याआधी स्वत:कडे पाहावे.

 

तर मनसेला टोला लगावताना कायंदे म्हणाल्या, जो तो उठतो आणि म्हणतो बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार पुढे घेऊन जातोय. बाळासाहेबांचे फोटो लावतात. मग जनतेने तुम्हाला सत्ता का दिली नाही. जनतेने तुमचे विचार ऐकलेत का? 2009 च्या विधानसभेत लोकांनी भरभरून मतदान केले पण पुढे काय झाले? उद्धव ठाकरे यांनी 2014 मध्ये स्वत:च्या हिमतीवर 63 आमदार निवडून आणले. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून त्यांचे नेतृत्व पुढे उभे राहिले.

 

भाजपा (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना कायंदे म्हणाल्या,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तासनतास दिल्लीत जाऊन बसतात. दिल्ली समोर त्यांना मान झुकवावी लागते.
माईक खेचणे, चिठ्ठ्या पाठवणे हे सगळे राज्यातील जनता पाहत आहे. निवडणुका सर्वांसाठी खुले मैदान आहे.
पक्ष पाठिशी होता म्हणून तुम्ही निवडून आलात. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, निवडून येत असता तर काँग्रेस (Congress) सोडून शिवसेनेत (Shivsena) आला नसता.

 

कायंदे पुढे म्हणाल्या, पक्षाचा एबी फॉर्ममुळे उमेदवाराला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळते.
कार्यकर्त्यांची मोठी फौज मिळते. कार्यकर्ते उमेदवारासाठी जीवाचे रान करतात. उद्धव ठाकरे पाठिशी होते म्हणून
हे आमदार निवडून आले. जनता या बंडखोर आमदारांना उत्तर देईल.
प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली गाठावी लागते हे दुर्दैव आहे.
चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) विधानाने भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील दु:ख समोर आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Shivsena | before teaching others look at yourself first shivsena Spokesperson Manisha Kayande criticizes mns chief raj thackeray

 

हे देखील वाचा :

ITR Filing | जर तुमच्याकडे नसेल फॉर्म 16 तरीसुद्धा फाईल करू शकता आयटीआर, जाणून घ्या कशी आहे ही पद्धत

Pune Crime | ऑडी खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्राद्वारे मिळविले 40 लाखांचे कर्ज; बँक मॅनेरजरसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime | निलेश घायवळ टोळीचा सदस्य आणि गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या रोहित आखाडे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 92 वी कारवाई

 

Related Posts