IMPIMP

Shivsena MLA Ramesh Latke | शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन

by nagesh
Shivsena MLA Ramesh Latke | shivsena mla ramesh latke dies of heart attack in dubai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latke) यांचं दुबईमध्ये (Dubai) आकस्मिक निधन (Died) झालं आहे. रमेश लटके हे 52 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं निधन झालं असून ते आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी सहकुटुंब दुबईला गेले होते. तेव्हाच हा प्रकार घडला असून या वृत्तामुळे शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आमदार रमेश लटके  यांच्या निधनाची वार्ता कळताच अंधेरीमधील लटके यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच दुसरीकडे राजकीय श्रेत्रातील व्यक्तींकडूनही लटके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे  यांच्यासहीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी देखील ट्विटरवरुन लटके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री अचानक लटके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरून मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title : Shivsena MLA Ramesh Latke | shivsena mla ramesh latke dies of heart attack in dubai

हे देखील वाचा :

MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत ठणठणीत; हॉस्पिटलमधून हात हलवत चाहत्यांना दिला प्रतिसाद

Chhatrapati Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा ! म्हणाले – ‘अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार’ (व्हिडीओ)

Ajit Pawar on Nana Patole | अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले – ‘त्यांचं वक्तव्य हास्यास्पद, ते कोणत्या पक्षातून आले ?’

Beed Dhamangaon Ghat Accident | दुर्देवी ! पुण्याहून बीडकडे जाताना कारचा भीषण अपघात; प्रसिध्द व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Related Posts