IMPIMP

Ajit Pawar on Nana Patole | अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले – ‘त्यांचं वक्तव्य हास्यास्पद, ते कोणत्या पक्षातून आले ?’

by nagesh
Nana Patole On Ajit Pawar | NCP leader ajit pawar responsible for eknath shindes mutiny big allegation of congress nana patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar on Nana Patole | भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत (Bhandara Gondia Zilla Parishad Election) काँग्रेसला (Congress) एकाकी पाडण्यात आले. राष्ट्रवादीने (NCP) भाजपसोबत (BJP) आघाडी केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चांगलेच संतापले असल्याचे पाहायला मिळाले. “मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू,’ असं पटोले म्हणाले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. (Ajit Pawar on Nana Patole)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”ते कोणत्या पक्षातून काँगेस मध्ये आले, याचा त्यांनी विचार करावा,” असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. ”भाजप म्हणणार का आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे संघटनेत प्रत्येक पक्ष काम करतो. आमचं महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी असेल तरच 145 आकडा गाठणं शक्य आहे,” असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar on Nana Patole)

 

पुढे अजित पवार म्हणाले, ”जिल्ह्यात वेगळ्या घटना घडतात तिथली राजकीय परिस्थिती वेगळी असते वातावरण नीट राहावे असे प्रयत्न होतात.
समन्वय नसला, तर प्रश्न उभे होतात. काँग्रेसने पण तालुक्याच्या ठिकाणी भाजप बरोबर संधन बांधलं होतं.
त्यामुळे जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा वेडावाकडा परिणाम होणार नाही हे बघावे,” असं ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय म्हणाले होते नाना पटोले ?
”स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात असाव्यात, अशी भूमिका ठरली होती.
पण भंडारा – गोंदियात (Bhandara -Gondia) राष्ट्रवादीने भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करून पाठीत खंजीर खुपसला.
भिवंडीतही आमचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले. मैत्री करायची तर प्रामाणिक करायची. शत्रुत्व करायचं तर ते समोरून केलं पाहिजे.
सोबत राहून अशा प्रकारे वर्तन केलं जात असेल तर हे बरोबर नाही.
मी हायकमांडशी चिंतन शिबिरात चर्चा करेन.
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे राष्ट्रवादी आमच्यासोबत वागतेय, ते बरोबर नाही,” असं नाना पटोले म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar on Nana Patole | ncp leader ajit pawar speaks on congress leader nana patole statement over bhandara zp elections

 

हे देखील वाचा :

Beed Dhamangaon Ghat Accident | दुर्देवी ! पुण्याहून बीडकडे जाताना कारचा भीषण अपघात; प्रसिध्द व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Accident on Yamuna Expressway | यमुना एक्सप्रेसवेवर कारची ट्रकला जोरात धडक ! पुण्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Gold Silver Price Today | लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Related Posts