IMPIMP

Chhatrapati Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा ! म्हणाले – ‘अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार’ (व्हिडीओ)

by nagesh
Chhatrapati Sambhaji Raje | chhatrapati sambhaji raje will contest rajya sabha elections independently pune news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Chhatrapati Sambhaji Raje | राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje) यांची आज (गुरूवार) पुण्यात (Pune) पत्रकार परिषद सुरू आहे. गेल्या काही दिवसापुर्वी खासदार संभाजीराजे यांनी एक वेगळी राजकीय भूमिका मांडणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र संभाजीराजे कोणती भूमिका मांडणार याबाबत चर्चा होत्या. आता चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचं ते म्हणाले. (Sambhaji Raje will contest Rajya Sabha elections independently)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) म्हणाले की, “या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचे हित पाहिलं. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे 29 अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवं.” असं ते म्हणाले.

 

तसेच, ”फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावं अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही”, असं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नव्या संघटनेची स्थापना –

दरम्यान, ”छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य (Swarajya). यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली असल्याचं,” संभाजीराजे म्हणाले.

 

 

Web Title : Chhatrapati Sambhaji Raje | chhatrapati sambhaji raje will contest rajya sabha elections independently pune news

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar on Nana Patole | अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले – ‘त्यांचं वक्तव्य हास्यास्पद, ते कोणत्या पक्षातून आले ?’

Beed Dhamangaon Ghat Accident | दुर्देवी ! पुण्याहून बीडकडे जाताना कारचा भीषण अपघात; प्रसिध्द व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Accident on Yamuna Expressway | यमुना एक्सप्रेसवेवर कारची ट्रकला जोरात धडक ! पुण्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

 

Related Posts