IMPIMP

Shivsena MP Arvind Sawant | अरविंद सावंतांचा फडणवीसांना सवाल, म्हणाले – ‘पुण्यात तुमचा कंट्रोल नसतो मग मुंबईत कुणाचा असतो? तेव्हा का तमाशा…’

by nagesh
MP Arvind Sawant | people can wait to bury 40 mlas arvind sawant on shinde group mla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने पुण्याचे (Rain in Pune) अक्षरश: तळे झाले. रस्त्यावरून नद्या वाहत होत्या, नागरिकांच्या घरात पाणी शिरले. अनेक वाहने वाहून गेली. यानंतर चुकीच्या पद्धतीने विकास कामे झाल्याने हे संकट ओढावल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. मात्र पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) भाजपाची सत्ता असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटले होते की, पाऊस किती पडावा याच्यावर महापालिकेचा कंट्रोल नसतो. त्यांच्या या विधानानंतर मुंबईत पाणी तुंबल्यावर भाजपा (BJP) नेत्यांची जी प्रतिक्रिया असते ती सध्या त्यांना ऐकवण्यात येत आहे. या दुटप्पीणावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना बोलके बाहुले तर उपमुख्यमंत्र्यांना अलिबाबा म्हणत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) यांनी शिंदे-फडणवीसांवर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) म्हणाले, मुंबईतील खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची आता कुठे आहेत? ती नाची मी शोधतोय. पुण्यात पडलेल्या पावसावर उपमुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले? पाऊस काय आमच्या कंट्रोलमध्ये असतो का? मग मुंबईत पाऊस (Mumbai Rain) कुणाच्या कंट्रोलमध्ये असतो? तेव्हा का तमाशा करता?

 

अरविंद सावंत पुढे म्हणाले की, ती नाची कुठे आहेत, ते सध्या मी शोधतोय. मुंबईतल्या खडड्यात नाचणारी नाची पुण्यात कशी गेली नाहीत? ती नागपूरला का नाचायला गेली नाहीत? हा खरा प्रश्न आहे. पावसामुळे निर्माण होणार्‍या अशा मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सतत आम्ही विरोधी पक्षातले लोक ओरडतो, म्हणून किमान पावसाच्या आणि शेतकर्‍यांना मदतीच्या मुद्द्यावर बैठक तरी झाली.

 

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतल्याने सरकारला सुनावताना अरविंद सावंत म्हणाले,
आमदार भास्कर जाधव यांचे संरक्षण काढले आणि तासाभरात त्यांच्या घरावर हल्ला झाला.
हे कशाचे द्योतक आहे? ही काय लोकशाही आहे का? त्याचा जितका निषेध करावा, तितका थोडा आहे.
गुन्हा दाखल झाला असला तरी त्याने फार काही फरक पडत नाही. मुळात लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे विचारांचे आदान-प्रदान आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) घटनेत दिलेल्या अधिकारांवर घाव घालण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. महाराष्ट्रात त्याचे अनुकरण होत आहे.

 

Web Title :- Shivsena MP Arvind Sawant | shivsena mp arvind sawant slams devendra fadnavis bjp on pune rain

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | भिडे यांच्याबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिली नवीन माहिती

Sambhajiraje Chhatrapati | ‘मंत्र्यांचे माहित नाही, मी राजवाडा सोडून आलोय…’, संभाजीराजे छत्रपती पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा

 

Related Posts