IMPIMP

Shivsena On Shinde-Fadnavis Govt | शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला गंभीर इशारा, दसरा मेळाव्याला परवानगी दिली नाही तर…

by nagesh
Shivsena On Shinde-Fadnavis Govt | shivsena milind vaidya slams cm eknath shinde on dussehra melawa 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Shivsena On Shinde-Fadnavis Govt | विभाग अधिकार्‍यांकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिले आहे. 16 तारखेला विधी खात्याकडे दसर्‍याच्या परवानगीबाबत वॉर्डने विचारणा केली आहे. पण विधी खात्याकडून आजपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत उत्तर देता येणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे परवानगी मिळो वा ना मिळो, उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) सांगतील त्या ठिकाणी शिवसैनिक जमतील, असे मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते मिलींद वैद्य यांनी म्हटले आहे. (Shivsena On Shinde-Fadnavis Govt )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिलींद वैद्य यांनी आज पालिकेच्या जी-नॉर्थ विभाग कार्यालयात जाऊन दसरा मेळाव्याच्या परवानगीसंदर्भात विचारणा केली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मिलिंद वैद्य यांनी जी-नॉर्थ कार्यालयात तैनात पोलीस बंदोबस्तावरही टीका केली. ते म्हणाले, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त ही शिवसेनेची ताकद आहे. हे सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांची किती भीती आहे, हे या बंदोबस्तावरून दिसते. हे सरकार वेगळ्या पद्धतीने स्थापन झाले आहे. त्यांच्या मनात असेल त्या पद्धतीने काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. (Shivsena On Shinde-Fadnavis Govt)

 

वैद्य यांनी राज्य सरकारला इशारा देताना म्हटले की, दसरा मेळावा वर्षानुवर्षं शिवाजी पार्कमध्ये भरवला जातो. बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटायला शिवसैनिक इथे यायचे. त्यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक येथे यायचे. पण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून सरकारची दडपशाही सुरू आहे.

 

वैद्य म्हणाले, ही दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही. 22 ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्याबाबत परवानगी अर्ज दिला आहे. पण त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही. परवानगी जर नाकारली, तर शिवसैनिक काय करेल, हे मी सांगण्याची गरज नाही. त्यासंदर्भात आदेश उद्धव ठाकरे देतील. त्याचे आम्ही पालन करू.

 

शिंदे-फडणवीस सरकार शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याला मैदान मिळू नये यासाठी प्रयत्नशील आहे.
यावरून राजकारण तापले आहे.
22 ऑगस्ट रोजी यासंदर्भात परवानगी मागणारे पत्र शिवसेनेने दिले असतानाही त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
त्यानंतर शिंदे गटाने सुद्धा परवानगीसाठी पत्र दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shivsena On Shinde-Fadnavis Govt | shivsena milind vaidya slams cm eknath shinde on dussehra melawa 2022

 

हे देखील वाचा :

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महापालिका नोकरभरती; 386 जागांसाठी सव्वालाखांहून अधिक उमेंदवारांचे अर्ज ; उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी दिली मुदतवाढ

Maharashtra Politics | जयंत पाटील यांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘दर 15 दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला जावे’

Pune ACB Trap | ग्रामविकास अधिकाऱ्याकडून 30 हजार रुपये लाच घेताना सहायक लेखा परीक्षा अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts