IMPIMP

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन ; फुलांची उधळण, कोल्ड फायरची विद्युत अतिशबाजी आणि ढोल ताशाचा दणदणाट

by nagesh
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | Immersion of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati with a spectacular procession

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ त्यावर उभारलेला रणशिंग
पुष्प चौघडा आणि रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतिषबाजी व सोबतीला मर्दाणी खेळांसह ढोल-ताशाचा दणदणाट अशा दिमाखदार आणि
तब्बल दहा तासांहून अधिककाळ चाललेल्या लक्षवेधक विसर्जन मिरवणूकीने हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत
भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन (Ganesh Visarjan) झाले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रथा-परंपरेनुसार शुक्रवारी सकाळी मंडईतील महात्मा फुले पुतळ्याला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. मानाच्या पाच गणपतीलाही ट्रस्ट कडून पुष्पहार अपर्ण करण्यात आला.  उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यानंतर रात्री अकरा वाजता प्रत्यक्षात या मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक रथाला विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यावर चारही बाजूंनी रणशिंग पुष्प चौघडा उभारण्यात आले होते. तर या रथावर कोल्ड फायरच्या माध्यमातून विद्युत आतिषबाजी करण्यात येत होती. त्यामुळे हा रथ गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारण फेडत होता.

 

 

 

शुभ्र पांढऱ्या बैल जोडीने सजलेल्या या रथाचे सारथ्य उत्सव प्रमुख पुनीत बालन हे स्वतः करत होते. मिरवणुकीच्या सुरवातीला भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा विराजमान असलेला रथ लक्ष वेधून घेत होता. त्यापाठोपाठ शिवयोद्धा मर्दाणी आखाडा यांच्या बाल कलाकारांकडून लाठी-काठी , तलवार बाजी, भाला खेळ अशा विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके साजरी केली जात होती. त्यापाठोपाठ समर्थ, नादब्रम्ह आणि श्रीराम या ढोल ताशा पथकाचे वादन केले जात होते.

 

 

 

लक्ष्मी रस्त्यावर ही विसर्जन मिरवणूक आल्यानंतर विविध ठिकाणी परंपरेनुसार  भाऊसाहेब रंगारीला पुष्पहार अपर्ण करून संबधित मानाच्या व्यक्तीच्या हस्ते आरती केली जात होती. मिरवणूक मार्गावर ठीकठिकानी नागरिकाकडून पुष्पवृष्टीही केली जात होती. त्यात रथावर होणारी विद्युत रोषणाई यामुळे हा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

 

 

 

पोलीस आयुक्तांच्या हस्ते आरती

 

शनिवारी सकाळी नऊ वाजता टिळक चौकात ( अलका )  श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बापाच्या रथाचे आगमन झाले. याठिकाणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) व महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे (PMC Vilas Kanade) यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती झाली. यावेळी या चौकात भाविकांची प्रचंड गर्दी आली. गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया या जय घोषाने संपूर्ण चौक दणाणून गेला होता. त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | Immersion of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati with a spectacular procession

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | संपूर्ण राज्यात पावसाचा ‘येलो’ अलर्ट, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

Police Family On MP Navneet Rana | ‘पोलिसांबद्दल तू नेहमीच अपशब्द वापरतेस, आता माफी माग, नाहीतर…’; नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

Pune Pimpri Crime | गणेश विसर्जन मिरवणुकीवरुन तळेगावमध्ये टोळक्यांचा राडा, दोघांवर कोयत्याने वार

 

Related Posts