IMPIMP

Pune Pimpri Crime | गणेश विसर्जन मिरवणुकीवरुन तळेगावमध्ये टोळक्यांचा राडा, दोघांवर कोयत्याने वार

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Pimpri Crime | गणपती मंडळाच्या विसर्जनाचा (Ganapati Mandal Immersion) कार्यक्रम चांगला केल्याच्या रागातून विरोधी गटाच्या दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन तीन जणांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना शुक्रवारी (Pune Pimpri Crime) (दि.9) रात्री साडेबाराच्या सुमारास भेगडे आळी येथे घडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कुणाल ठाकूर (Kunal Thakur), वैभव अवचरे (Vaibhav Auchare), कुणाल दुबे (Kunal Dubey), धीरज गरुड (Dheeraj Garud), अर्थव शिंदे (Arthav Shinde), श्रेयस उर्फ बंटी अनिल किरवे Shreyas alias Bunty Anil Kirve (वय-24), किरण (पूर्ण नाव माहिती नाही), विजय उर्फ किरण विकास भालेराव Vijay alias Kiran Vikas Bhalerao (वय-22), दिपक लालमण शिगणे Deepak Lalman Shigane (वय-18) यांच्यासह इतर 8 ते 10 जाणावर IPC 307, 324, 143, 144, 147, 148, 149 सह आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभम नरसिंग आडके Shubham Narsingh Adke (वय-22 रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रेयस उर्फ बंटी अनिल किरवे, विजय उर्फ किरण विकास भालेकर आणि दिपक लालमण शिगणे यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अक्षय प्रकाश गायकवाड (Akshay Prakash Gaikwad) हे त्यांच्या मोरया मित्रमंडळ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर बोलत बसले होते. कुणाल ठाकूर व त्याच्या इतर साथिदारांना फिर्यादी यांनी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम चांगला पार पाडला याचा आणि जुन्या भांडणाचा राग होता. याच कारणावरुन कुणाल व त्याचे इतर साथिदार 7 ते 8 दुचाकीवरुन गणेश मंडळाजवळ आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मित्राला मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या कोयत्याने वार करुन फिर्यादी व त्यांच्या मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळी (API Sali) करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | After the Ganesh Visarjan procession, gangs rioted in Talegaon, two were stabbed with spears

 

हे देखील वाचा :

Amit Thackeray | सत्तेत लवकरच येणार, अमित ठाकरेंचे सूचक वक्तव्य; राज ठाकरेंचे दोन विश्वासू शिलेदार ‘वर्षा’वर

Weight Loss Diet | तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 वस्तू, वाढणार नाही वजन

Top Stocks | कोणत्या शेअरने मिळेल पैसा? फेस्टिव्ह सीझनसाठी एक्सपर्टने सुचवले ‘हे’ 5 स्टॉक्स

 

Related Posts