IMPIMP

Police Family On MP Navneet Rana | ‘पोलिसांबद्दल तू नेहमीच अपशब्द वापरतेस, आता माफी माग, नाहीतर…’; नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

by nagesh
Police Family On MP Navneet Rana | Amravati mp navneet rana who created chaos in the police station should apologise demands of the police family

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – Police Family On MP Navneet Rana | कथित लव्ह जिहाद प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. या प्रकरणातील तरूणीने आपण रागाच्याभरात घरातून निघून गेलो होतो, राणा यांनी यांनी माझी विनाकारण बदनामी केली, असा जबाब पोलिसांना दिला आहे. दरम्यान, याच प्रकरणात नवनीत राणा यांनी पोलिस ठाण्यात मोठा राडा करत पोलिस अधिकार्‍यांशी हुज्जत घातली होती, तसेच एका पोलिस अधिकार्‍याने आपला कॉल रेकॉर्ड केला असा आरोप करत अधिकार्‍याचा मोबाईल फोन स्वताच्या ताब्यात घेतला होता. यावरून पोलीसांच्या कुटुंबियांमध्ये देखील राणांविरूद्ध संताप व्यक्त होत आहे. एका पोलीस पत्नीने राणा यांना खडेबोल सुनावत माफी मागण्यास सांगितले आहे. (Police Family On MP Navneet Rana)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘नवनीत राणा तुला शेवटची संधी देते…’

 

या प्रकरणी पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी खासदार नवनीत राणा यांना म्हटले आहे की, नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरेच माणुसकी असेल ना, तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग. नाहीतर तुला आता मी सोडणार नाही. तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहेस. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. तुला पोलिसांचे दुःख नाही कळणार. पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरतेस. आता मात्र त्यांची माफी मागावी लागेल, अन्यथा तुला सोडणार नाही, असा इशारा भोयर यांनी दिला आहे. (Police Family On MP Navneet Rana)

 

अमरावतीत कथित लव्ह जिहादप्रकरणी चौकशी करण्यासाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना फोन केला असता काही मिनिटांनी हा कॉल रेकॉर्ड करण्यात आला, असा आरोप राणा यांनी केला होता.
पोलिसांनी लोकप्रतिनिधींचा फोन कोणत्या अधिकाराखाली रेकॉर्ड केला, मी दलित आहे म्हणून माझा फोन रेकॉर्ड
करता का, असे प्रश्न विचारत नवनीत राणा यांनी पोलीस अधिकार्‍यांसमोर मोठा गोंधळ घातला होता.
शिवाय एका पोलीस अधिकार्‍याचा मोबाईल फोन देखील ताब्यात घेतला होता. आता हे कथित लव्ह जिहादप्रकरण
संबंधित तरूणीच्या जबाबामुळे नवनीत राणा यांच्यावरच उलटले आहे.

 

एकुणच या प्रकरणात नवनीत राणा यांनी पोलिसांशी चुकीचे वर्तन केल्याने पोलीसांची कुटुंबे संतप्त झाली आहेत.
आता पोलिसांची माफी माग, नाही तर तुला सोडणार नाही, असा इशारा एका पोलीस पत्नीने दिल्याने नवनीत राणा
चांगल्याच गोत्यात आल्या आहेत.

 

अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
ही मुलगी सापडल्यानंतर तिने मी रागाच्या भरात घर सोडून गेले होते, नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असा
आरोप केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Police Family On MP Navneet Rana | Amravati mp navneet rana who created chaos in the police station should apologise demands of the police family

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | गणेश विसर्जन मिरवणुकीवरुन तळेगावमध्ये टोळक्यांचा राडा, दोघांवर कोयत्याने वार

Amit Thackeray | सत्तेत लवकरच येणार, अमित ठाकरेंचे सूचक वक्तव्य; राज ठाकरेंचे दोन विश्वासू शिलेदार ‘वर्षा’वर

Weight Loss Diet | तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 वस्तू, वाढणार नाही वजन

 

Related Posts