IMPIMP

Siddharth Jadhav | सिद्धार्थ जाधव लवकरच ‘या’ बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार

by nagesh
 Siddharth Jadhav | after cirkus film failure siddharth jadhav started shooting if marathi film

सरकारसत्ता ऑनलाईन  – Siddharth Jadhav | अभिनयाच्या जोरावर मराठी कलाक्षेत्रातच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ रामचंद्र जाधव आपल्या सर्वांचा लाडका हिरो सिद्धू. हिरो म्हंटल्यावर त्याच दिसणं आणि सुंदर चेहरा हा संकेत बदलवत नायक हा फक्त अभिनयानेच पुढे जातो, अभिनयच सर्वश्रेष्ठ हे त्याने सिद्ध केले. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘सर्कस’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो रणवीर सिंगबरोबर काम करताना दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर सिद्धार्थ (Siddharth Jadhav) आता पुन्हा एका नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपल्या नवीन येणाऱ्या चित्रपटाबद्दल त्याने आपल्या सोशल माडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली.
त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘थ्री चिअर्स’ असे आहे. “.. नवा दिवस .. नवी भूमिका .. नवा चित्रपट” असा कॅप्शन त्याने त्याच्या फोटोला दिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर हे करणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसोबत (Siddharth Jadhav) विजय पाटकर, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी हेही कलाकार दिसणार आहेत.

 

 

काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
सिद्धार्थला काही दिवसांपूर्वी ‘धुराळा’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी कलादर्पण पुरस्कार मिळाला होता.
चित्रपटांप्रमाणे सिद्धार्थ जाधव स्टार प्रवाह वाहिनीवर “आता होऊ दे धिंगाणा” या कार्यक्रमातून आपल्या भेटीस
येत असतो. ‘सर्कस’ चित्रपटाच्या बरोबरीने तो ‘बालभारती या मराठी चित्रपटातही झळकला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Siddharth Jadhav | after cirkus film failure siddharth jadhav started shooting if marathi film

 

हे देखील वाचा :

Akshaya Deodhar | मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाली….

Madhuri Dixit Nene | ‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितने नाकारला होता हम साथ साथ है चित्रपट

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

 

Related Posts