IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shinde showered praise on sharad pawar in pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन  पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (VSI Pune) ४६ व्या सर्वसाधारण सभेत आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, ‘मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते, त्यावेळी मी शरद पवार यांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देताता.’ यावेळी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार यांच्याबाबत पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते, गेल्या आठवड्यात संक्रात झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचं, मीही गोड गोड बोलणार. मी नुकतंच दावोसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणलेली आहे. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. शरद पवार राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी नेहमी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा फोन करतात तेव्हा सूचना करतात. सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही.’

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) साखर उद्योगावर भाष्य केले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगांचा नंबर लागतो. आर्थिक चक्र सक्रिय ठेवण्यात साखर उद्योगांचा (Sugar Industry) मोठा हातभार लागतो. साखर उत्पादनात जगात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ही अभिमानाची बाब आहे. साखर उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे. असंख्य शेतकरी साखर उद्योगावर अवलंबून आहेत म्हणूनच अठरा प्रकल्प आम्ही राबवत आहोत. या क्षेत्रास शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी माणसाची गरज आहे.’ असे देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

तसेच, शरद पवार हे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून, सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत.
असे देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यापुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच इथेनॉल वापराला प्राधान्य देतात.
याचा निश्चित साखर कारखानदारांना फायदा होईल. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो.
तेच शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजे.
त्यानुसार शेतीत आणि उद्योगांत बदल करायला हवेत.
लवकरच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी मदत करावी अशी मागणी करणार असून, त्यांनी आत्तापर्यंत चांगली मदत देखील केली आहे.
असे देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  CM Eknath Shinde | eknath shinde showered praise on sharad pawar in pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात FIR

Beed Crime News | खरेदीहून येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू

Kiara Advani | कियारा अडवाणीने सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल केला मोठा खुलासा

 

Related Posts