IMPIMP

High Court | ‘पत्नीने अपरात्री परपुरूषाला फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रुरपणा’ – हायकोर्ट

by nagesh
High Court | wife secret call after warning of husband is marital cruelty high court

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाHigh Court | केरळ न्यायालयाने (Kerala High Court) एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर करताना दिलेल्या आदेशाची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. ऐकायला वेगळा वाटत असला तरी केसही तशाप्रकारची आहे. पतीने सांगूनही जर पत्नी संधी साधून परपुरूषाला गुप्तपणे फोन करत असेल तर हा वैवाहिक क्रूरतेसारखा प्रकार आहे, असं न्यायालयाने (High Court) म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जोपर्यंत वैवाहिक जीवन हे पहिल्यासारखं होत नाही, तोपर्यंत फक्त तडजोड करणं म्हणजे क्रूरतेचं समर्थन होणार नाही, असं न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी आपल्या आदेशात सांगितलं.

 

या प्रकरणी पतीने हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली होती. मात्र, त्याची ही याचिका फेटाळली गेली होती. पतीने असा दावा केला होता की, लग्नाच्या सुरुवातीपासूनच पत्नीने त्याच्या आयुष्याला एकप्रकारे नर्क बनवून अनेक प्रकारची अनैतिक कृत्ये केली आहेत. त्याने असाही आरोप केला की त्याच्या पत्नीचे लग्नाआधी दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध (Immoral relations) होते, जे लग्नानंतरही तसेच सुरु राहिले.

 

पतीकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांनी, बीएसएनलकडून (BSNL) मिळवलेल्या सीडीच्या प्रिंट आऊटवरून लक्षात येतं की,
पत्नीचे एका परपुरूषासोबत वारंवार फोन झाले असून त्यांचे एका अनैतिक संबंध असल्याचा इशारा करतात.
यावर पत्नीची बाजू मांडणाऱ्या वकिल एम. बी. संदीप यांनी, पत्नी केव्हातरीच ते फोन करत होती.
त्यासोबतच त्यांनी या दाव्याचं खंडण देखील केलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, पत्नी फक्त फोन करत होती म्हणजे त्यांचं नात खराब किंवा त्यांचे अनैतिक संबंध होते असं होत नाही.
परंतु पतीने सांगूनही रात्री उशिरा परपुरूषाला फोन करणं हा वैवाहिक क्रूरतेसारखाच (Marital cruelty) प्रकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

 

Web Title :- High Court | wife secret call after warning of husband is marital cruelty high court

 

हे देखील वाचा :

Sandalwood Oil | टेन्शन, अस्वस्थता आणि कॅन्सरपासून वाचवते ‘या’ विशेष लाकडाचे तेल, घरी कसा करावा वापर? हे जाणून घ्या

Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील मोस्ट वाँटेड आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले ‘झोमॅटो डिलेव्हरी बॉय’ तर कधी ‘दुधवाले’, 11 महिन्यानंतर 2 सराईत समर्थ पोलिसांच्या जाळ्यात

Ashtavinayak Darshan | गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शन केवळ 5 तासात

 

Related Posts