IMPIMP

Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील मोस्ट वाँटेड आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले ‘झोमॅटो डिलेव्हरी बॉय’ तर कधी ‘दुधवाले’, 11 महिन्यानंतर 2 सराईत समर्थ पोलिसांच्या जाळ्यात

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | समर्थ पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांवर मोक्कअंतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक (Arrest) केली असून त्यांचे दोन साथिदार पोलिसांना गुंगारा देत होते. आरोपींना अटक करण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) तपास पथकाची (Investigation Team) चार पथके तयार करण्यात आली होती. आरोपींची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी वेषांतरही केले. अखेर सोमवारी समर्थ पोलिसांनी मोक्का गुन्ह्यातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना (Most Wanted Criminal) बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शुभम दिपक पवळे Shubham Deepak Pavale (वय-24 रा. लक्ष्मीनगर, दत्तवाडी – Dattawadi, पुणे), आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे Akash alias Sky Mangesh Saswade (वय-22 रा. डुल्या मारुती जवळ, गणेश पेठ – Ganesh Peth, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे (Pune Criminals) आहेत. आरोपींवर समर्थ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात मोक्का कायद्यानुसार कारवाई (Pune Crime) करण्यात आली होती. कारवाई झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. आरोपींनी 11 महिने पोलिसांना गुंगारा दिला. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

 

आरोपींचा शोध घेण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यातील 4 पथके आरोपींचा शोध घेत होते. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जेरे (API Sandeep Jere) व पोलीस अंमलदार यांनी कधी झोमॅटो डिलेव्हरी बॉय (Zomato Delivery Boy), कधी दुधवाला (Milk Man) तर कधी गॅरेज मेकॅनिक (Garage Mechanic) बनून आरोपींची माहिती काढत होते. आरोपींची तांत्रीक माहिती गोळा करुन सोमवारी अंमलदारांच्या चार पथकाने सकाळी पाच वाजल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना मोक्का न्यायालयात (MCOCA court) हजर केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ. प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Naranvare),
सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सतिश भालेराव, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शरद वाकसे, संतोष थोरात, सुनिल हासबे, महिला पोलीस शिपाई छाया देवकर यांनी केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Crime | Samarth Police Arrest Two Criminals Who Abscond in MCOCA Case

 

हे देखील वाचा :

Ashtavinayak Darshan | गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शन केवळ 5 तासात

‘या’ सरकारी विमा योजनेच्या विमाधारकांनाही असेल, LIC च्या IPO मध्ये सवलतीचा अधिकार

Post Office MIS | मंथली इन्कम स्कीममध्ये पती-पत्नी मिळून उघडू शकतात अकाऊंट, 4950 रु. होईल दरमहिना इन्कम

 

Related Posts