IMPIMP

Sidharth Malhotra – Alia Bhatt | आलिया भट्टने दिल्या एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राला लग्नाच्या शुभेच्छा; त्यावर सिद्धार्थने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

by nagesh
 Sidharth Malhotra - Alia Bhatt | siddharth malhotra replied to alia bhatt status

सरकारसत्ता ऑनलाईन – Sidharth Malhotra – Alia Bhatt | अनेक दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अखेर हे दोघे 7 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकले. जैसलमेर मधील सूर्यगढ पॅलेसवर यांचा विवाह संपन्न झाला. आता त्यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. आता सिद्धार्थची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टने देखील या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर सिद्धार्थने देखील तिच्या त्या शुभेच्छांना प्रतिक्रिया दिली आहे. (Sidharth Malhotra – Alia Bhatt)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

5 तारखेला सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी कार्यक्रम संपन्न झाला. तर 6 तारखेला हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर 7 फेब्रुवारीला दुपारी हे दोघेही लग्न बंधनात अडकले. आता सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटोज मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत. सर्व सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आता आलियाने देखील त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत खास कॅप्शन देखील दिले आहे. आलियाने त्या दोघांचे फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले की “तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन…” तर आता सिद्धार्थने आलियाची ती पोस्ट रिपोस्ट करत म्हटले की “थँक्यू आलिया…” त्यांच्या या स्टोरीने ब्रेकअप नंतर ही त्यांच्यात घट्ट मैत्री असल्याचे दिसून येत आहे, यामुळे दोघांचे चाहते खुश दिसत आहेत. (Sidharth Malhotra – Alia Bhatt)

 

 

तर आलिया आणि सिद्धार्थ हे करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटात एकत्र झळकले होते.
दोघांचाही हा बॉलीवूड मधला पहिला चित्रपट होता.
या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
यानंतर अनेक वर्ष दोघेही एकमेकांना डेट करत होते. मात्र काही कारणाने दोघेही वेगळे झाले.
वेगळे होऊन देखील त्यांच्यातील मैत्री पाहता चाहते त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sidharth Malhotra – Alia Bhatt | siddharth malhotra replied to alia bhatt status

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ; रासने म्हणाले – ‘हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा’

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | राहुल कलाटेंची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंची एन्ट्री, खास व्यक्तीकडून धाडला निरोप; राहुल कलाटे अर्ज मागे घेणार?

 

Related Posts