IMPIMP

Solapur News | दिव्यांग निधी मिळवण्यासाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ अल्पवयीन भावाचा मृत्यू

by nagesh
Solapur News | Younger brother dies after sister in agitation for disability fund

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन   Solapur News | काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय स्थापन केले होते. दिव्यांगांचे प्रश्न जास्त प्रखरपणे सोडवता यावेत, यासाठी शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला होता. असे असताना मात्र दोन दिव्यांग मुलांचा निधीसाठी आंदोलन करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिव्यांग निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूरमधील बार्शीतल्या (Barshi) चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसलेल्या 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे तिच्या 10 वर्षीय भावाचादेखील या आंदोलनात मृत्यू झाला आहे. (Solapur News)

 

संभव रामचंद्र कुरुळे असे भावाचे नाव आहे. दिव्यांगांसाठी असलेला निधी मिळाला नाही म्हणून चिखर्डे, बार्शी येथील रामचंद्र कुरुळे आणि त्यांचे कुटुंबीय 18 ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यांच्यासह गावातील दहा ते पंधरा लोक उपोषणाला बसले होते. या आंदोलनात त्यांची अल्पवयीन मुलगी वैष्णवी कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. दिवसभर उन्हात उपोषणाला बसल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला, असा दावा स्थानिकांनी केला होता. वैष्णवीच्या निधनानंतर संबंधितांवर कारवाई करून निधी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर कुरुळे कुटुंबीयांनी आंदोलन स्थगित करून वैष्णवीच्या पार्थिववर अंत्यसंस्कार केले होते. (Solapur News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मात्र, तीन महिने होऊनही आश्वासन पूर्ण न केल्याने कुरुळे कुटुंबीय पुन्हा एकदा उपोषणाला बसले.
यावेळी ग्रामपंचायतीऐवजी गावातील स्मशानभूमीत कुरुळे कुटुंबीय उपोषणाला बसले होते.
या उपोषणादरम्यान रामचंद्र कुरुळे यांचा 10 वर्षांचा मुलगा संभव याचादेखील मृत्यू झाला.
त्यानंतर, वैष्णवी आणि संभव या दोन्ही दिव्यांग भावंडांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार आहे
आणि जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत संभवच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही,
अशी भूमिका कुरुळे कुटुंबीयांनी घेतली आहे.

 

Web Title :- Solapur News | Younger brother dies after sister in agitation for disability fund

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याने टोळक्याकडून मारहाण; तळेगाव दाभाडेमधील घटना

Pune Crime | प्लंबिंग कामगाराचा विजेचा शॉक बसून मृत्यू; ठेकेदारावर FIR, पुण्यातील घटना

 

 

Related Posts