IMPIMP

Sonalee Kulkarni | सोनालीच्या ‘व्हिक्टोरिया’ ची तारिख पुढे ढकलण्याचे हे आहे मुख्य कारण…

by nagesh
Sonalee Kulkarni | sonali kulkarni starrer film victorias release date has postponed

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) बहुप्रतिक्षित ‘व्हिक्टोरिया’ या सिनेमाची प्रेक्षकांना अजून वाट पहावी लागणार आहे. खुद्द सोनालीने (Sonalee Kulkarni) याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारिख समोर आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोनालीचा (Sonalee Kulkarni) ‘व्हिक्टोरिया’ हा सिनेमा आज म्हणजेच १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. याबाबतची माहिती निर्मात्यांनी दिली देखील होती. पण एक मोठं कारण देत या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे. सोनालीने (Sonalee Kulkarni) शेअर केलेल्या इंन्स्टाग्राम पोस्टनुसार, आता या चित्रपटाचे प्रदर्शन १३ जानेवारी २०२३ ला होणार आहे. याबाबत आपल्या पोस्टमध्ये सोनालीने ही माहिती दिली.

 

सोनालीने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याच कारण आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे. ती लिहीते, ‘व्हिक्टोरिया हा मोठ्या स्क्रीनच्या अनुभवासाठी बनलेला चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त शोज सह आणि इतर कोणत्याही संघर्षाशिवाय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आमचे ध्येय आहे आणि याच दृष्टीकोनातून आम्ही प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलत आहोत. व्हिक्टोरियाचे रहस्य आता १३ जानेवारी २०२३ ला उलगडणार…रसिक प्रेक्षकहो असेच प्रेम असू द्या!’

 

पण यामागचे खरे कारण हे हॉलीवूडचा सिनेमा अवतार -२ चे प्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे.
हा बहुप्रतिक्षित सिनेमा १६ डिसेंबरला रिलीज होणार असून त्या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी अधिकचे शो ठेवले आहेत.
त्यामुळे ‘व्हिक्टोरिया’ या सिनेमाला मोजक्याचं स्क्रीन मिळतील.
हे खरे कारण असल्याची कुरबूज प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे.
त्यामुळे या सिनेमाचे प्रदर्शन निर्मात्यांनी पुढे ढकलले असावे असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), आशय कुलकर्णी, पुष्कर जोग हे मुख्य भूमिका साकारणार आहेत.
नुकताच या सिनेमाच्या उर्वरित भागाचे शुटिंग इंग्लंड येथे पार पडले.
शुटिंग दरम्यानचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते.

 

Web Title :- Sonalee Kulkarni | sonali kulkarni starrer film victorias release date has postponed

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police-CID | CCTNS/ ICJS ही प्रणाली राज्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुणे सीआयडी मधील पो. नि. जीवन मोहितेंसह इतरांचा गौरव

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट

Sharad Pawar | उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो – शरद पवार

 

Related Posts