IMPIMP

Hanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची आफ्रिकेत ‘कमाल’

by nagesh
hanuma-vihari-india-a-vs-south-africa-2nd-unofficial-test-hanuma-vihari-shines-but-match-drawn-on-4th-day-due-to-bad-light

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Hanuma Vihari | भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए (India A vs South Africa A) यांच्यातील दुसरी अनधिकृत टेस्ट ड्रॉ झाली. या सामन्यादरम्यान अंधूक सूर्यप्रकाशामुळे ‘भारत ए’ संघाचे मॅच जिंकण्याचं स्वप्न साकार झाले नाही.भारतीय संघाने 234 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना 3 बाद 155 रन करत मॅचवर आपली पकड निर्माण केली होती. यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला होता. जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा 20 पेक्षा जास्त ओव्हर्सचा खेळ शिल्लक होता. यावेळी भारतीय टीमला मॅच जिंकण्यासाठी फक्त 79 रनची गरज होती. यावेळी हवामानात सुधारणा न झाल्याने मॅच ड्रॉ करण्यात आली. या मॅचमध्ये हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. यावेळी त्याने 116 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं नाबाद 72 रन काढले. विहारीनं पहिल्या इनिंगमध्येही अर्धशतक झळकावले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सध्या चालू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs New Zealand Test Series) हनुमा विहारीची टीम इंडियात निवड झाली नव्हती. आता आगामी आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याने निवड समितीला आपल्या बॅटने उत्तर देत, दावेदारी सादर केली. हनुमा विहारीसह अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Easwaran) यानेही या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. अभिमन्यू इश्वरन 55 रन काढून आऊट झाला. हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि अभिमन्यू इश्वरन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 133 रनची भागिदारी केली.

अभिमन्यू इश्वरन बाद झाल्यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे (Bad sunlight) खेळ थांबवण्यात आला.
या दोघांचा अपवाद वगळता बाकी भारतीय फलंदाजांना फारशी काही कमाल करता आलेली नाही.
यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 18 रन काढून तर प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) शून्यावर बाद झाला.याअगोदर दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 212 रन काढून ऑल आऊट झाली.
यावेळी इशान पोरेलने (Ishan Porel) 33 रन देत 3 विकेट्स घेतल्या.
तर नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि अर्झन नगवासवाल (Arjun Nagwaswal) यांना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या तीन मॅचच्या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची मॅच 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

हे देखील वाचा :

Pune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ! ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या

IPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’ टीमचा हेड कोच!

Pune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या चौघांना अटक; दरोड्याचा गुन्हा दाखल

 

 

Related Posts