IMPIMP

Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील 141 पोलिसांना कोरोनाची लागण; विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईस सुरुवात, 2 दिवसात दीड हजारांवर कारवाई

by nagesh
Pune Police Corona | 232 police personnel of pune police force affected by coronavirus

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Police | पुणे शहरातील कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर तसेच विविध बंदोबस्तात सहभागी होणारे पोलीसही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत आतापर्यंत शहर पोलीस दलातील १४१ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police ) राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक केली होती. त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय या गुन्ह्यातील आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट, शिवकुमार अन्य ५ आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) यांच्यासह ११ अधिकारी व कर्मचार्‍यांनाही संसर्ग झाला आहे.

 

 

दोन दिवसात दीड हजारांवर विना मास्क कारवाई

शहरातील कोरोना संसर्ग वाढू लागल्याने शहर पोलीस दलाने आता सार्वजनिक ठिकाणी विना मास्क (Withour Mask) फिरणार्‍यांवर कारवाई (Pune Police Action) करण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन दिवसात सुमारे दीड हजार लोकांना प्रत्येकी ५०० रुपये दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये वसुल करण्यात आले आहेत. यापुढे ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे.

 

Web Title :-  Pune Police | 141 policemen in Pune city police force infected with corona; Action started on unmasked pedestrians action on one and a half thousand in 2 days

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बहिणीला दिली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ! तिने घेतले 1 कोटी 40 लाखांचे कर्ज; रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूला अटक

 

Related Posts